मिल रोलरचे पुजन प्रसंगी चेअरमन संजयबाबा घाटगें ची माहिती
व्हनाळी(सागर लोहार): केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याचे गळीत हंगाम तयारी अंतर्गत मिलरोलर चे पूजन अक्षय तृतीयाच्या शुभ मुर्हतावर करण्यात आले. अन्नपुर्णा शुगर कारखान्याची आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू आहे या वर्षी पूर्ण कार्यक्षमतेने सुमारे अडीच लाख मेट्रीक टन गाळप करन्याचे उदिष्ट असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन कारखान्याचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले.
केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या मिल रोलरच्या पुजन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थीत गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे होते. यावेळी मिल रोलर चे पुजन संचालक शिवसिंह घाटगे,सौ.सिमंतीनी घाटगे यांचे हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थीत करण्यात आले.
संजय घाटगे पुढे म्हणाले, पहिल्याच गळीत हंगामात इतर कारखान्यांच्या बरोबरीत दर देण्याचा आपण प्रयत्न केला. वाहतुकदार,तोडणी मजूर,ऊस उत्पादक शेतक-यांना बिले आदा केली. केमिकल फ्री गुळपावडर,सल्फर लेस साखरेला मोठी मागणी असल्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे येत्या गळीत हंगामासाठी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दतोपंत वालावलकर,एम.बी.पाटील,दिनकराव पाटील, के.के.पाटील, तानाजी पाटील,मल्हारी पाटील,सुभाष करंजे,अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास एम.टी.पोवार, सुरेश मर्दाने, ज्ञानदेव पाटील, के.बी.वाडकर, विष्णूपंत गायकवड, किरण पाटील, केनवडे उपसरपंच सौ.शुभांगी बाजीराव पाटील, दतात्रय दंडवते, शंकर सांवत, रत्न कांबळे, दत्ता पाटील आदी शेतकरी सभासद कर्मचारी उस्थीत होते.
मेगावॅट वीज महावितरणला देणार….
मागील गळीत हंगामात कारखान्यामध्ये सहवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज ही कारखान्यासाठीच वापरली होती. यावर्षी सहवीज प्रकल्पातून सुमारे 1 मेगावॅट वीज महावीतरणला देण्याचे नियोजित आहे. त्यामुळे कारखान्याचे व सभासदांचे हित नक्कीस होईल असा ठाम विश्वासही संजयबाबा घाटगे यांनी मनोगतातून व्यक्त केला.