साके परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी 

व्हनाळी(वार्ताहर) : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साके परिसरात  मोठ्या उत्साहात  शिवज्योतीचे स्वागत, शिव प्रतिमेची मिरवणुक, प्रतिमा पूजन, भाषण रांगोळी स्पर्धा अशा विविध उपक्रमाव्दारे साजरी करण्यात आली.

Advertisements

पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतिचे पुजन माजी सैनिक शशिकांत पाटील यांनी केले. तर शिवप्रतिमेचे पुजन राजू सातुसे, मच्छिंद्र पाटील, किरण पाटील, संतोष ससे यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisements

सकाळी 9 वाजता पारंपरिक लेझीम  ढोल ताशाच्या निनादात  भव्य मिरवणूक काढून छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली शिवजयंती चे संयोजन साके येथील कै.कु.डि.के.पाटील ग्रुप यांनी केले होते.

Advertisements

यावेळी नितीन पाटील, विजय पाटील, समाधान कोराणे,सागर तुरंबे, सौरभ सातुसे, रोहित पाटील, दत्तात्रय पाटील, तानाजी पाटील ,धनाजी पाटील, नेताजी पाटील सुरेश पाटील गावचे सरपंच ,सदस्य तंटामुक्त समितीचे पदाधिकारी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!