दिव्यांग व्यक्तींकडे UDID कार्ड नसेल तर ८१०७०४०२०२ या क्रमांकावर संपर्क करा  –  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 2 : जिल्हयातील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही दिव्यांग पुरुष व महिलांकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अथवा त्यांच्यासाठी खासकरुन शासनाकडून देण्यात येणारे UDID (यू.डी.आय.डी.) कार्ड जर नसेल तर  अशा व्यक्तींचे नाव, त्याचा फोन नं. आणि कोणत्या गावात अथवा शहरात राहतो, त्या गाव शहराचे नाव ८१०७०४०२०२ या क्रमांकावर Whatsapp/SMS व्दारे पाठवावे किंवा संबंधीत दिव्यांग व्यक्तीला वरील नंबरवर … Read more

Advertisements

सांगाव येथील विवाहित महिलेची आत्महत्या नसून घातपात

कागल पोलिसात भावाची तक्रार कागल / प्रतिनिधी – कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे विवाहित महिलेने केलेली आत्महत्या नसून तो घातपात आहे. अशी तक्रार आत्महत्या केलेल्या महिलेच्या भावाने कागल पोलीस ठाण्यात दिलेली आहे. याप्रकरणी मयत महिलेचे पती, सासू ,सासरे यांना कागल पोलिसांनी अटक केलेली आहे. तस्लीमा सोहेल मुल्ला वय वर्षे 25 राहणार कसबा सांगाव, तालुका -कागल … Read more

राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड्डे कधी मुजणार

कागल जवळ अपघातग्रस्त खड्डेच खड्डे कागल / प्रतिनिधी : कागल शहरानजीक राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे व लांबलचक चर पडल्याने वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते आहे. खड्ड्यात दुचाकी व चार चाकी वाहने अडकून नुकसान होत आहे. शिवाय अपघात होऊन काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे खड्डेमय झालेला महामार्ग कधी सुधारणार अशी चर्चा वाहनधारकातून होत आहे. पुणा-बेंगलोर राष्ट्रीय … Read more

हातकणंगले व गडहिंग्लज या दुष्काळग्रस्त तालुक्यात शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती तात्काळ अंमलात – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करुन त्या संबंधी सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यामध्ये शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती लागू करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. … Read more

शिरोडा समुद्रात बुडून कागलच्या एकाचा मृत्यू

कागल : शिरोडा (जि. सिंधुदुर्ग) येथील समुद्रात बुडून कागल येथील अवधूत हरिभाऊ जोशी (वय ३९) यांचा मृत्यू झाला. दिनांक 26 च्या दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. अवधूत जोशी हे त्यांच्या मित्रांसोबत वेळागर-शिरोडा येथे पर्यटनासाठी गेले होते. समुद्रकिनारी पोहण्यासाठी सर्वजण पाण्यात गेले होते. यावेळी अवधूत यांना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. यावेळी मित्रांनी … Read more

शिवराजच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना तुळशी रोपांचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील शिवराय विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगूड मधील राष्ट्रीय हरित सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तुळशी विवाह निमित्त तुळशी पूजनासाठी विद्यार्थ्यांना तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज चे उपमुख्याध्यापक आर. बी. शिंदे होते. तुळस ही बहुगुणी वनस्पती असून आयुर्वेदामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या पुराणग्रंथांमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे एक … Read more

प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अॅवॉर्ड प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल -सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांना पुणे येथे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य डॉ. एस. एन. पठाण यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अॅवॉर्ड २०२३ गौरवपूर्ण समारंभात प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह … Read more

कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली : पालकमंत्री हसन मुश्रीफ

बिद्रीच्या निवडणूकीतील सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचा वाघापुरातून प्रचार शुभारंभ मडिलगे (जोतिराम पोवार) : मागील सात वर्षे राज्यात उच्चांकी उस दर देणाऱ्या आणि विविध प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बिद्री साखर कारखान्याची बदनामी करणाऱ्या विरोधी मंडळींना मते मागण्याचा अधिकार नाही. राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेल्या आणि कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना या निवडणूकीत धडा शिकविण्याची वेळ आली … Read more

सदाशिवराव मंडलीक महाविद्यालयाचे प्रा. डॉ . शिवाजी होडगे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी मॉरिशसला रवाना

मुरगूड ( शशी दरेकर ) – मॉरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व अभ्यास दौऱ्यासाठी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे नुकतेच रवाना झाले आहेत. भारत मॉरिशस आंतर सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध, कला साहित्य आणि संस्कृती यास अनुसरून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मॉरिशस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 आणि 24 … Read more

२४ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा भरला आठवणींचा वर्ग

मुरगुड विद्यालयच्या माजी विद्याथ्यानीं केली लाखाची मदत मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड विद्यालय हायस्कूल ज्युनिअर कॉलेज या शाळेच्या इयत्ता दहावी 1999 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कडून गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा मुरगुड विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहाने पार पडला, तब्बल 24 वर्षानी जणु आठवणींचा वर्ग या ठिकाणी भरला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे … Read more

error: Content is protected !!