जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुसानिमित्त कबनूर परिसरातील वाहतुक मार्गात बदल

कोल्हापूर दि. 13 : कबनूर, ता. हातकणंगले येथील जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुस दि. १५ ते २२ मार्च २०२३ या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. या कालावधीत वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी व वाहनांना सुरक्षित पार्किंग उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम (१) (ब) अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दर्गा उरुस काळात कबनूर … Read more

Advertisements

मुरगूडच्या राणा मांगलेची बुलेट छब्या व बाशिंग भवरा बैलगाडी प्रथम

बैलगाडी शर्यतशौकिनांची प्रचंड गर्दी मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूडात सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक , मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते ऍड . विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगलेच्या बुलेट छब्या व बाशिंग भवरा या बैलगाडीने प्रथम क्रमांकांच्या सव्वा लाखाच्या रोख बक्षीसासह चषक पटकावला. सर पिराजीराव तलावा शेजारील माळावर बऱ्याच … Read more

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

कोल्हापूर, दि. 2 : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटूंबांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येते, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. अनुसूचित जातीच्या … Read more

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक कामकाज पार पाडावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 17 : येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजूर, महिला व बालके यांच्या आरोग्य तपासणीकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने पूर्वनियोजन करुन आरोग्य तपासणी करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना … Read more

लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची सात दिवस पर्वणी

कोल्हापूर प्रतिनिधी:- देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या विविध राज्यातून आलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. कणेरी मठावर वीस ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचभूत … Read more

जिल्ह्यातील लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणात – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 16 : जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या गो-वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग साथीच्या सांसर्गिक रोगामुळे आजअखेर 1 हजार 96 इतकी जनावरे मृत झाली. सद्यस्थितीत गो-वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग साथीने बाधित होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याने गोवर्गीय लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पशुवैद्यकीय दवाखाना चौकाक, तालुका हातकणंगले अंतर्गत असणा-या … Read more

पी. एम. किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याचे 27 फेब्रुवारी रोजी वितरण होणार

PM Kisan

कोल्हापूर, दि. 16 : पी. एम. किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे वितरण दिनांक 27 फेब्रुवारी, 2023 रोजी होणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आधार सिडींग प्रलंबित लाभार्थींची बँक खाते आयपीपीबी (इंडीयन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये भारतीय डाक विभागाच्या मार्फत उघडण्यात येत आहेत. पी. एम. … Read more

5 मार्चला ‘ रन फॉर हेल्थ.. रन फॉर मिलेट’ चे आयोजन – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

कोल्हापूर, दि. 14 :  चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व घराघरांत पोहोचवणे गरजेचे आहे, यासाठी जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबवावेत, असे सांगून 5 मार्च रोजी रन फॉर हेल्थ रन फॉर मिलेट (पौष्टिक तृणधान्य जनजागृती दौड) आयोजित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपक्रम             आंतरराष्ट्रीय … Read more

एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – आमदार हसन मुश्रीफ

आमदार हसन मुश्रीफ यांचे किरीट सोमय्या यांना प्रतीआव्हान कागल : भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार करत आरोप खोडून काढले आहेत. सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी … Read more

एकजुट समाजनिर्मितीसाठी गांधीविचार प्रेरक – एस. डी. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – 150 वर्षाच्या ब्रिटीशाच्या जुलमी राजवटीतुन भारताला मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींचे योगदान खुप मोठे योगदान आहे.पण स्वातंत्र्याचा 75 वर्षानंतर धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एकजुट निर्माण करण्याची गरज आहे अशा या एकजुट समाजनिर्मितीसाठी गांधी विचारच प्रेरक ठरतील असा ठाम विश्वास एस.डी.पाटील यांनी व्यक्त केला.मुरगुड,ता.कागल येथील समाजवादी प्रबोधनी … Read more

error: Content is protected !!