प्रथमेश चौगले यांच्या संशोधनास कोरियन पेटंट प्राप्त

मुरगूड (शशी दरेकर) : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, देवचंद कॉलेज अर्जूननगर व सेजाँग युनिव्हर्सिटी कोरिया यांच्या संशोधक विद्यार्थी प्रथमेश चौगले मुरगूड, अक्षता पट्टनशेट्टी, महेश बुरुड, विजय चव्हाण या संशोधकांना इंडक्शन – कम्बशन रासायनिक पद्धतीसाठी कोरियन सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.          या संशोधनासाठी संशोधन प्रमुख प्रो. ड्यू की किम, डॉ. संदीप साबळे, डॉ. अविनाश रामटेके  यांच्या … Read more

Advertisements

कोल्हापूर जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज; ‘या’ त्रिसूत्रीवर भर

आदर्श आचारसंहितेतील २४, ४८ आणि ७२ तासांतील कार्यवाही तातडीने पूर्ण करा कोल्हापूर, दि. ६: कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या नगरपंचायत/नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत निष्पक्षता, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण कार्यवाही या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी मार्गदर्शन सूचनांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक टप्प्यातील … Read more

निधन वार्ता- जयश्री सुरेश दिवटे

मुरगुड : शिंदेवाडी येथील जयश्री सुरेश दिवटे (वय ६५) यांचे निधन झाले. ठाणे येथे कार्यरत असणारे  पोलीस सागर दिवटे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन  गुरुवार दि. ६ नोहेंबर रोजी सकाळी ९ वाजता आहे.

राजे गट मुरगूड नगरपालिकेच्या सर्व जागा नगराध्यक्षासह ताकतीने लढवणार – अमरसिंह घोरपडे

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड नगरपालिका निवडणुक ताकदीने लढविण्यची राजे समरजिततसिंह घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी चालू आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे गटाकडून मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षसह नगरसेवकच्या सर्व जागा लढविण्याच्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू ठेवा आसे प्रतिपादन अमरसिंह घोरपडे यांनी केले. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुरगूड येथे राजे फौंडेशनच्या  बैठकीत बोलताना त्यांनी इच्छुकांनी उमेदवारीबाबत … Read more

५० हजाराची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या विनायक ढेंगे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता. कागल येथिल राणाप्रताप चौकातील संतोष हाटेलमध्ये सुभाष नाईकवडी यांचे सापडलेले ५० हजार रुपये व ठेवपावत्या हॉटेल मालक विनायक ढेंगे यानीं प्रामाणिकपणे परत केली. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात असा प्रामाणिकपणा विरळच ..! या प्रामाणिकपणाचे कौतूक पत्रकार महादेव कानकेकर यानीं केले. यावेळी कानकेकर म्हणाले विनायक ढेंगे यानी दाखविलेला प्रामाणिकपणा हा  आदर्शवत … Read more

टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी मंत्री मुश्रीफ आक्रमक!

कोल्हापूर: पुणे ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे (Pune- Kolhapur National Highway) काम जर ३१ जानेवारीपर्यंत दर्जेदार आणि पूर्ण झाले नाही, तर या महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत मुश्रीफ यांनी रस्त्यांच्या कामावर … Read more

किल्ले बांधणी आधी गडभ्रमती महत्वाची – अरुण माने

स्पर्धैत नवमहाराष्ट्र मंडळाने पटकावला पहिला क्रमांक मुरगूड ( शशी दरेकर ) : मुलांनी किल्ले बांधणी करण्यापूर्वी गडभ्रमंती करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्या किल्ल्याची माहिती होते आणि आपण त्या किल्ल्याची निर्मिती परिपूर्णरित्या आपण करू शकतो असे प्रतिपादन महापारेषण चे अरुण माने यांनी व्यक्त केले. ते नवकला मंचच्या माध्यमातून आयोजित “छोटे मावळे “किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांच्या … Read more

भाजप हा आमचा मोठा भाऊ; आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा        

नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा कागल : महायुतीमध्ये भाजपा हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कागलसह गडहिंग्लज, मुरगुड या नगर परिषदांवर कागल विधानसभा मतदारसंघातील आठ जिल्हा परिषद मतदार संघांसह १६ … Read more

कर्नाटकात जाताना शिवसेना (उबाठा) नेते विजय देवणे, संजय पवारांना सीमेवर रोखले!

कागल / प्रतिनिधी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस आहे. कर्नाटक _महाराष्ट्र सिमेवर एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. कर्नाटकात वास्तव्यास असणाऱ्या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, सेना नेते संजय पवार हे शनिवारी सकाळी दहा वाजता कर्नाटकात जात होते. त्यांना महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी रोखून … Read more

कार्तिकी एकादशी निमित्त भक्ती सोहळा शाहू कॉलनीत हरिनामाचा गजर

कागल : कार्तिकी एकादशीच्या पावन निमित्ताने सदाशिव जाधव फाउंडेशन, कागल यांच्या वतीने रविवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी शाहू कॉलनी येथे भव्य भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून होणाऱ्या या कीर्तन व भजनाच्या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्तिकी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. … Read more

error: Content is protected !!