बँकेच्या नवकल्पनांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीचा एक भक्कम आधारस्तंभ असलेल्या विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेला यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आर्थिक सक्षमीकरणाची गरज ७८ वर्षांपूर्वी ओळखून स्वर्गीय विश्वनाथराव पाटील यांनी या बँकेची स्थापना केली होती. सहकार तत्वावर उभी राहिलेली … Read more

दुधगंगा वेदगंगा साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, देशाला परकीय चलन बचत! कोल्हापूर, दि. २३ : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात (मौनीनगर) उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्राला समर्पित … Read more

सरपिराजीराव तलावाच्या सांडव्या वरती पुल व्हावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुरगूड शहरवासीयांतर्फे निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. हा कार्यक्रम सपन्न झाल्यानंतर सरपिराजी तलावाच्या सांडव्याच्या पाण्यावर पूल व्हावा या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यानां मुरगूडवाशियातर्फै देण्यात आले. मुरगुड शहराच्या पूर्व बाजूस सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेल्या तलाव … Read more

बनावट जन्म प्रमाणपत्रांना चाप लागणार; ‘एसओपी’ची अंमलबजावणी सुरू

महसूलमंत्र्यांकडून जन्म नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता; रद्द प्रमाणपत्रे परत घेणार अखेर जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ (प्रमाणित कार्य पद्धती) लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता जन्म प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे. रद्द झालेली प्रमाणपत्रे परत जमा करण्याची सूचना मंत्रालयात झालेल्या बैठकीत, … Read more

गोकुळ शिरगावजवळ गाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; चालक जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील साई प्रसाद हॉटेलजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गायींची वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून, वाहनातील काही गायींनाही दुखापत झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०९ बीसी ०४०३ क्रमांकाचा टेम्पो चालक अभिजित आप्पासो पाटील (वय ३२, … Read more

कागलमध्ये लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

कागल (विशेष प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुनाथ बाळू पाटील यांच्या घरी झालेल्या या चोरीमुळे कागल पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या … Read more

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २१: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल झालेला नाही, त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहोचवण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत महत्त्वाचे निर्णय मंत्रालयात झालेल्या एका आढावा बैठकीत विविध शिष्यवृत्ती योजना … Read more

कागल शहरात मान्सूनपूर्व कामांसाठी आपत्कालीन व्यवस्था सज्ज – मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर

स्वच्छता मोहीम, नालेसफाई आणि धोकादायक बांधकामांवर विशेष लक्ष कागल: कागल नगरपरिषदेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मान्सूनपूर्व कामांसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या आदेशानुसार पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरात सध्या युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. यामध्ये ठिकठिकाणी असलेले उकिरडे, कचऱ्याचे ढीग हटवणे, … Read more

“माझे घर, माझा अधिकार”: राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

२०३० पर्यंत ३५ लाख घरांचे उद्दिष्ट ! मुंबई, २१ मे (जिमाका): “माझे घर, माझा अधिकार” या ब्रीदाला अनुसरून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घर देण्याचे अभिवचन देणाऱ्या राज्याच्या गृहनिर्माण धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, डाटा आधारित निर्णय प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानाचा … Read more

संभाव्य पूरस्थितीसाठी इचलकरंजी-हातकणंगलेत सूक्ष्म नियोजन : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अमोल येडगे यांचे निर्देश: पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज कोल्हापूर, २१ मे : मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी आणि हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचे आदेश दिले आहेत. पूरबाधित निलेवाडी आणि जुने पारगाव येथील ठिकाणांना तसेच निवारा केंद्राला भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना प्रशासनाच्या … Read more

error: Content is protected !!