कापशी मधील नराधम शिक्षकांवर कठोर कारवाई व्हावी मुरगुड मधील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शाळेमध्ये निसार अहमद महोद्दीन मुल्ला या नराधम शिक्षकाने शाळेमधील एका निरागस विद्यार्थिनींची छेडछाड केली. या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुरगूड हिंदुत्ववादी संघटना व शिवभक्त यांच्या वतीने मुरगूड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी नागरिकांची मागणी कळवून आरोपीला … Read more

मुरगूड मधील जनावारांच्या बाजारात चांगल्या सुविधा मिळाव्यात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरामधील मध्यवर्ती असणारा जनावरांच्या बाजारामधून नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते मात्र त्या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी देत असलेल्या पावतीच्या मानाने त्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नाही. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. ठिक-ठिकाणी पाणी साचल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण देखील वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये … Read more

विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांकडून चोप

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील रानडे विद्यालयातील सहाय्यक शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केले. हा प्रकार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. पालकांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकास बेदम चोप दिला. निसारीअहमद मोहीदिन मुल्ला, रा. कापशी तालुका कागल असे त्या नराधम शिक्षकाचे नाव आहे. त्या शिक्षकास अटक करून पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. कापशी … Read more

कोल्हापूर विमानतळावर यशस्वी आपत्कालीन मॉकड्रिल

आगीवर नियंत्रण, जखमींना मदत आणि प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची चाचणी यशस्वी गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : अलाहाबाद येथे नुकत्याच झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांवर सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन तयारीचा आढावा घेतला जात असताना, कोल्हापूर विमानतळावर रविवारी (येथील माहितीनुसार) आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेचे मॉकड्रिल यशस्वीपणे पार पडले. यात आगीवर नियंत्रण मिळवणे, जखमींना मदत करणे … Read more

करवीर तालुक्यातील शाळा परिसर होणार तंबाखूमुक्त !

मुख्याध्यापक कार्यशाळेतून शिक्षकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ कोल्हापूर: भावी पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने, करवीर तालुक्यातील शाळांना तंबाखूमुक्त करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने जिल्हा परिषद आणि इतर व्यवस्थापनांच्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात एक विशेष कार्यशाळा संपन्न झाली. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP), जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सलाम … Read more

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मुंबई :   राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 28 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 30 जून 2025 रोजी 11.30 पर्यंत 3.4 ते 4.9 मीटर उंच लाटांचा इशारा … Read more

Maharashtra FYJC merit list 2025: पहिली गुणवत्ता यादी जाहीर, प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा

महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने एफवायजेसी (अकरावी) प्रवेशासाठी कॅप (CAP) फेरी १ ची जागा वाटप यादी/गुणवत्ता यादी आज, २८ जून २०२५ रोजी जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे, ते www.mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर पहिली गुणवत्ता यादी तपासू शकतात. महत्त्वाच्या तारखा: प्रवेश प्रक्रिया: विद्यार्थी त्यांचा अर्ज क्रमांक वापरून त्यांना मिळालेल्या कनिष्ठ … Read more

मुरगूड येथील सुर्यवंशी कॉलनीत बंद घर फोडून चोरी

सोने, चांदी दागिन्यांसह ३ लाख ३३ हजार रुपयांसह अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीतील बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून तिजोरीचे कुलूप उचकटून सोने-चांदी आणि रोकड अशा तब्बल ३ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. याबाबत रेखा टिपुगडे यांनी … Read more

CBSE 10 वी आणि 12 वी पुरवणी परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या नियमित बोर्ड परीक्षेत एक किंवा अधिक विषयांत अपेक्षित गुण मिळाले नाहीत किंवा जे आपले गुण सुधारू इच्छितात, त्यांच्यासाठी ही परीक्षा एक सुवर्णसंधी आहे. अधिकृत घोषणेनुसार, इयत्ता 10वीच्या पुरवणी परीक्षा 15 जुलैपासून सुरू होऊन … Read more

राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापुर (प्रतिनिधी) : आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खऱ्या अर्थाने प्रिंटर, पुस्तके, स्मार्ट टीव्ही शाळांना देऊन मूलभूत घटकांची पायाभरणी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर भर दिल्याशिवाय विकास शक्य नाही आणि आज अशा उपक्रमांद्वारे तेच कार्य त्यांच्यामार्फत होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास होत असतो, मात्र दुर्दैवाने आज भारतामध्ये फक्त … Read more

error: Content is protected !!