मुरगूड येथे ८ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा छडा ! संशयितास अटक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील महालक्ष्मीनगरमध्ये प्रा. नंदकिशोर स्मार्त यांच्या घरी ८ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा छडा लागला असून या चोरीच्या गुन्हयातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक (वय  ३३ रा. होसूर ता. जिल्हा बेळगाव ) यास  अटक करण्यात आली आहे.

Advertisements

       दि ७ व ८ सप्टेंबर रोजी मुरगूड शहरामध्ये चोरटयांनी धूमाकूळ घालत १३ ठिकाणी  चोरी केली होती. येथील महालक्ष्मीनगरमध्ये प्रा स्मार्त यांच्या बंद  घराचा दरवाजाचा कडी कोंयडा उचकटून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह डीव्हीआरही काढून नेला होता तो चोरट्यांनी नदीत फेकून दिल्याचे सांगण्यात येते. या चोरीत लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागीने लंपास केले होते.

Advertisements

या चोरी प्रकरणातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक हा मुरगूड पोलीसांना रात्रीची गस्त घालत असताना संशयितरित्या फिरताना आढळून आला व त्याच्या अंगठयाच्या ठशावरून त्याचा मुरगूडमधील चोरी प्रकरणासी संबंध असल्याचे उघडकीस आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.

     दरम्यान लक्ष्मण मारुती नाईक याला अटक केली असून अन्य  साथीदार फरारी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले पोलीस त्याच्या व चोरीच्या मुद्देमाल हस्तगत करण्याच्या शोधात आहेत. या प्रकरणी मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सतीश वर्णे व संदीप ढेकळे अधिक तपास करीत आहेत.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!