सिद्धनेर्ली येथे व्यक्तीवर खुरप्याने हल्ला

कोर्टातील केस माघार घे म्हणून धमकावत हल्ला सिद्धनेर्ली : येथील शिवाजी कृष्णात पोवार यांच्यावर खुरप्याने सागर उर्फ दिपक शिवाजी गोनुगडे याने वार करत कोर्टातील चेक बाऊन्सची केलेली केस माघार घ्या, नाहीतर तुम्हांला सोडत नाही अशी धमकी दिली त्यावेळी सुर्याजी पाटील हे सदरचे भांडण सोडवित असताना त्याना देखील शिवीगाळी करुन लाथाबुक्कयांनी मारहाण केली. या घटनेची नोंद … Read more

Advertisements

सर्व दुग्ध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण अनिवार्य

कोल्हापूर, दि. 15 : जिल्ह्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दूध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे वर्ग-3 इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य आहे. तरी जिल्ह्यातील सर्व दुध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण वापरण्याबाबत 1 जानेवारी 2023 पूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक रा.ना.गायकवाड यांनी दिले आहेत. नियंत्रक वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार … Read more

बालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिमची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी – जिल्हाधिकारी रेखावार

collector

कोल्हापूर, दि. 14 : गोवर हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा झपाट्याने प्रसार होऊ शकतो. ज्या भागातील मुलांनी गोवर प्रतिबंधात्मक लस घेतली नाही अशांमध्येच प्रामुख्याने हा आजार दिसून आल्यामुळे राहीलेल्या बालकांना लसीकरणासाठी नियोजन करण्यात आलेले असून, नागरिकांनी आपल्या घरातील व परिसरातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी गोवरची लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले … Read more

सिद्धनेर्ली येथील तरुण बेपत्ता

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील श्री. विकास विलास सूर्यवंशी (वय ३४) हे दिनांक २४/११/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले आहेत. ते अद्याप परत आलेले नाहीत. घरातील सर्वांनी तसेच नातेवाईकांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाहीत. त्यांच्या घरातील लोकांनी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी कागल … Read more

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम भारमल यांना वाचनालयाच्या वतीने अभिवादन

हुतात्मा तुकाराम रामचंद्र भारमल … मुरगूडचे आद्य हुतात्मा क्रांतीकारक मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडचे क्रांतीकारक हुतात्मा “तुकाराम भारमल ” यानां वाचनालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले . प्रथम प्रतिमा पूजन श्री .आण्णासो ज्ञानदेव गोधडे ( वस्ताद ) यांच्या हस्ते करण्यात आले. इंग्रजांच्या जुलमी आणि अत्याचारी जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर १९२० … Read more

….. आणि पवनच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

मुरगूड ( शशी दरेकर ) : कु. पवन दिपक साळुंखे सांगलीचा. “सांगली गुजराथी हायस्कूलमध्ये इयत्ता ८वी मध्ये शिकणारा विद्यार्थी .. अलिकडे घरच्या दारिद्रयामुळे आई – वडीलांच्या सोबत एका छोटयाशा भाडयाच्या खोलीत मुरगूडमध्ये रहायला आला आहे. पवनचे वडील दिपक साळुंखे हे लोहार व इतर कामे करून संसाराचा गाडा चालवत आहेत. हा व्यवसाय सांभाळतानां दोन वेळ कसेतरी … Read more

कागल येथे शॉक लागून व्यक्ती मयत

काझी मळा, कागल येथील शेतजमीन गट नं 237/238 मधील विहीरीजवळ मुस्तफा तैमूर काझी वय 72 वर्ष रा. मुजावर गल्ली, कागल यांचा शॉक लागून मरण पावला. हिदायतुल्ला पापालाल काझी यांचे शेतातील बोअरचे इलेक्ट्रीक डिपीचे लोखंडी पेटीला शॉक लागून ते मयत पावलेत.

खा. शरदचंद्र पवार यांचा ८२ व्या वाढदिवसानिमित्त कागल येथे केक कापून वाढदिवस साजरा

कागल: देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्र पवारसाहेबांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण आयोजन केले होते. तसेच विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत नियुक्तीपत्र वाटप करुन आदरणीय खा.शरदचंद्र पवारसाहेबांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केडीसीसी बँकेचे … Read more

कागल निढोरी रोड रुंदीकरणानंतर वाहने सुसाट

रस्त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांचा जीव मुठीत घेऊन वावर कागल : अनेक वर्षांच्या मागणीनंतर कोकणचे प्रवेशद्वार असलेला कागल- निढोरी मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे तसेच डांबरीकरणही समाधानकारक सुरू आहे. पण यामुळे या मार्गावरील पिंपळगाव खुर्द, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, बामणी, पिंपळगाव बुद्रुक, भडगाव, निढोरी गावातील नागरिकांना रस्त्याच्या अलीकडे पलीकडे असलेल्या शेत वाडीत जाताना, जनावरांना शेताकडे, पाण्यासाठी घेऊन जाताना आपला … Read more

मुरगूड येथे ”होमगार्ड वर्धापन दिन ” वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम कार्यक्रम उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र गृह रक्षक दल अंतर्गत होमगार्ड व नागरी संरक्षण दिन यांच्या ७६ वा वर्धापन दिनानिमित्त मुरगूड पोलिस ठाणे अंतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वृक्षारोपण मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे.राहूल वाघमारे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. या वेळी होमगार्ड कडून पोलीस ठाणे परिसारात विविध … Read more

error: Content is protected !!