बातमी

केनवडे अन्नपुर्णा पत संस्थेच्या चेअरमनपदी साताप्पा तांबेकर
व्हा. चेअरमनपदी बाजीराव पाटील

व्हनाळी (वार्ताहर) : केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा भैरवनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्थेच्या चेअरमनपदी साताप्पा तुकाराम तांबेकर तर व्हा. चेअरमनपदी बाजीराव धोंडिराम पाटील (केनवडे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्षस्थानी अन्नपुर्णा शुगरचे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. निवडणूक निर्णयक अधिकारी म्हणून ए.एन.शिंदे यांनी काम पाहिले.

यावेळी संचालक मारूती पाटील, विष्णूपंत गायकवाड, संजय चिंदगे, सौ.आनंदी शा. पोवार, सौ.विमल हिं.मगदूम, विलास कांबळे, आनंदा खंडागळे, पत्रकार सागर लोहार, सुहास रोड्डे, सौ. पूनम चव्हाण, संदीप पोवार उपस्थीत होते. स्वागत मॅनेंजर तानाजी कांबळे यांनी केले आभार प्रवीण वासकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *