माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णांना फळे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) : माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा सत्कार व वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून त्यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त मुरगूड शहर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच त्यांच्या दीर्घायुषासाठी मुरगुडचे ग्रामदैवत श्री अंबाबाईला अभिषेक देखील घालण्यात आला. यावेळी अन्नपूर्णा शुगरचे संचालक धनाजी गोधडे, राजेश … Read more

मुरगूडच्या लक्ष्मी-नारायण पतसंस्थेच्या अपघाती मयत सभासदांच्या वारसानां एक लाखाचा चेक सुपर्द

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील सुवर्णमहोत्सवी व सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३३००सभासदाचा ओशिएन्टल इश्योरन्स कंपनीकडे जी .पी. ए .विमा उतरविलेला होता. संस्थेच्या शाखा सावर्डे बुII येथिल मयत सभासद कै . शामराव बाबु सुर्यवंशी रा .पिपळगांव बु II यांचा आपघाती मृत्यू झाल्याने सदर … Read more

लिंगनूर-कापशी येथील शेतामध्ये बेवारस पुरुषाचा मृतदेह

मुरगूड (शशी दरेकर) : लिंगनूर-कापशी येथिल शेतामध्ये बेवारस पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नारायण आवळे यांच्या नागराळ नावाच्या शेतामध्ये हा मृतदेह आढळला. याबाबतची वर्दी गावकामगार पोलीस पाटील बापुसो पाटील यानीं मुरगूड पोलिस ठाण्यात दिली. अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅट, उंची ५ फुट २ इंच, … Read more

कागलमध्ये घरफोडीत १७ लाखांचा ऐवज चोरीस

कागल : येथील कागल सांगाव मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास दत्त कॉलनी मधील बंगल्याच्या दाराचा कडी कोयंडा उचकटून बंगल्यात प्रवेश करून ३१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांची रोकड असा सुमारे १७.४७ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला याबाबतची फिर्याद शंकर घाटगे (रा. दत्तनगर, कागल) यांनी कागल पोलिसांत दिली. कागल-सांगाव रोडवर दत्तनगर येथे शंकर घाटगे यांचा रत्नाई  बंगला … Read more

मुरगुड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

मुरगुड (शशी दरेकर) – येथील पोलीस ठाण्यामध्ये कार्यक्षेत्रातील शांतता कमिटीची नुकतीच बैठक झाली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विविध जाती धर्मातील आगामी सण समारंभ, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आणि मयंत्या आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामधून अपवादात्मक पारिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नयेत, अशा आक्षेपार्ह … Read more

निढोरीत सुषमाताई अंधारे यांची तोफ धडाडणार

मुरगूड (शशी दरेकर) – निढोरी ता.कागल येथे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील व अॅटवन्स कला,क्रीडा व सांस्कृतिक युवामंच निढोरी यांच्या संयोजनातुन गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023 सामाजिक कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. त्या ‘राजकारणाची दिशा व दशा (आपली संविधानात्मक जबाबदारी)’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा व्याख्यानाचा कार्यक्रम जेष्ठ … Read more

कुरणीकडे जाणाऱ्या नदीपुलाजवळ अपघाताची शक्यता

पुलाजवळील रस्त्याची दुर्दशा मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता.कागल येथुन कुरणी व भडगांव या दोन्ही गावांना एकाच रस्त्याने जोडले आहे.हा रस्ता वेदगंगा नदीवरून जातो. या ठिकाणी बंधाऱ्याच्या सहाय्याने हा रस्ता जोडला गेला आहे.सध्या या रस्त्याची अवस्था बिकट बनली आहे. पुलाच्या ठिकाणी खाचखळग्यांनी रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागत … Read more

नाव गांधींचे पण काम नथुरामाचे यामुळेच वर्तमानकाळ अस्वस्थ – प्रा. प्रसाद कुलकर्णी

मुरगूड ( शशी दरेकर ) – हुकुमशाहीत दमनाची भीती असते तर लोकशाहीत प्रलोभनाची भीती असते. आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये भारतीय नागरिकांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून समाजवाद, धर्मनिरपेक्षता, संघराज्य यासारख्या महत्वाच्या मुल्यांचं अवमूल्यन सुरू आहे. भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही आघात होत आहे. मुलभुत प्रश्नांना बगल देऊन जातीधर्मांच असंविधानिक राजकारण होत आहे.अशाप्रकारे देशामध्ये महात्मा गांधीजींचे नाव घेऊन नथुरामाचे काम … Read more

नवाळे समुहाकडून आनंदाचा शिधा वाटप करून साजरी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

सिद्धनेर्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव खुर्द ता कागल येथील अशोकराव नवाळे समुहाच्या श्री इंदिरा सहकारी दुध संस्था,रास्त भाव धान्य दुकान यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य शासनाने जाहिर केलेल्या आदेशानुसार गुढी पाडवा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप नवाळे समुहाचे संस्थापक व तालुका खरेदी … Read more

बसवेश्वर सेवा संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप

सिद्धनेर्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव खुर्द ता कागल येथील श्री बसवेश्वर विकास सेवा संस्थेत फोटो पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन महेश चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री बसवेश्वर विकास सेवा संस्था पिंपळगाव खुर्द धान्य दुकानांमध्ये … Read more

error: Content is protected !!