वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३६ दिनांक १९-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली ? मानवाधिकार आयोगाचा राज्यांना सवाल

धोकादायक कचऱ्याची सफाई हाताने करण्याच्या पद्धतीचे उच्चाटन करावे नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आज धोकादायक कचरा सफाईच्या संदर्भात राज्यांना थेट सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १४ स्पष्ट निर्देशांनंतरही, आजही काही भागांमध्ये हाताने सफाईची पद्धत सुरू असल्याबद्दल आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना पाठवलेल्या पत्रात … Read more

कागलजवळ भीषण अपघात: गोकुळ शिरगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कागल ( प्रतिनिधी ) : कागल अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा मृत्त्यु झाला. आनंद पाल राहणार गोकुळ शिरगाव असे मयत इसमाने नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सूमारास महामार्गावरील लक्षमी टेकडी जवळ घडला. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या परीस्थिती कडे दुर्लक्ष करुन कार नंबर ka-23-n-7815 ही ट्रेलरला ओव्हरटेक … Read more

मंत्रालयात सामान्यांची धास्ती का? सामान्य नागरिकांचा मंत्रालयातील प्रवेशासाठी संघर्ष!

मुंबई: राज्याचे मंत्रालय, जे सामान्य जनता, गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या सेवेसाठी उभारले गेले आहे, त्याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. कामांसाठी शेकडो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या सामान्य माणसांना मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओळखपत्र दाखवून, तासन् तास रांगेत उभे राहून आणि अनेक तपासण्या पार करून मंत्रालयात प्रवेश मिळतो. यामुळे मंत्रालयात येणाऱ्या … Read more

हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले ; नरकातला स्वर्ग पुस्तकातून खळबळजनक खुलासा ! 

मुंबई : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले, असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला आहे. ‘धर्म आडवा आला’ असे सांगत त्यांनी शरद पवारांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी “नरकातला स्वर्ग” हे पुस्तक … Read more

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सावर्डे बु॥ चा तरुण ठार

परीक्षेला जातानां रितेशवर काळाचा घाला मुरगूड ( शशी दरेकर ) : माद्याळ ता. कागल गावाजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संतोष राणे यांच्या शेताजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सावर्डे बु || (ता. कागल ) येथिल मोटरसायकलस्वार रितेश तानाजी पाटील ( वय २१ ) हा जागीच ठार झाला. रितेश हा परिक्षेसाठी गडहिंग्लज येथे परिक्षेसाठी … Read more

मुरगूड परिसरात पावसाची हजेरी

शेतातील झाड उन्मळुन पडल्याने विद्युत तारा तुटल्या मुरगूड ( शशी दरेकर ) : बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुरगूड व मुरगूड परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. गेले आठ दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. पण या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकानां दिलासा मिळाला. मुरगूड येथिल बहीर्जी पेट्रोल पंपाजवळून गावभागाकडे जाणाऱ्या रोडशेजारी … Read more

गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे देणार का राजीनामा? डोंगळे एकाकी पडल्याची चर्चा

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डोंगळेना संघातील इतर संचालकांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष अरुण डोंगळे वगळता संघाच्या सर्व संचालकांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर संचालकांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही सर्व एक संघ … Read more

बारा वर्षांच्या जिद्दीनंतर भरत झाला दहावी पास !

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे भरत कांबळे या तरुणानं खरं करून दाखवलं आहे. तब्बल बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भरतनं दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आस सोडली नाही आणि योग्य मार्गदर्शनामुळे आज भरतच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि आत्मविश्वास दिसत आहे.भरतचं बालपण अत्यंत संघर्षमय परिस्थितीत गेलं. आई-वडिलांचं आधार नसताना … Read more

पावसाळ्यापूर्वी तयारी पूर्ण करा; विभागीय आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज राहण्याचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले. जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना … Read more

error: Content is protected !!