पावसाळ्यापूर्वी तयारी पूर्ण करा; विभागीय आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज राहण्याचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले. जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisements

विभागीय आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत पोलीस, महसूल, जलसंपदा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आयुक्तांनी यावेळी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या स्तरावर एकत्रितपणे काम करावे. औषधोपचार आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा ठेवावा.

Advertisements

तसेच, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निवारा केंद्रांची व्यवस्था करावी. जलसंपदा विभागाने नद्यांवरील पुलांची पाहणी करून धोक्याची पातळी दर्शवणारे चिन्ह लावावेत, असे आदेशही त्यांनी दिले. एनडीआरएफच्या तुकड्यांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकतेनुसार तैनाती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisements
https://gahininathsamachar.com/read-online-gahininath-samachar-12-05-2025/

विभागीय आयुक्त म्हणाले,  यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जलसंपदा विभागाने सीडॅक  प्रतिमान उपयोगात आणून पूरस्थितीची माहिती देण्याचे नियोजन करावे. आवश्यक उपाययोजनांसाठी हवामान विभागाशी संपर्क ठेवावा. जलसंपदा विभागाने पुणे विभागात  असणाऱ्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे.  आवश्यक तेथे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने आंतरराज्य बैठका तातडीने घ्याव्यात. जलसंपदा विभागाने पूर परिस्थितीचा नेहमी सामना करणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Comment

error: Content is protected !!