शेतातील झाड उन्मळुन पडल्याने विद्युत तारा तुटल्या
मुरगूड ( शशी दरेकर ) : बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुरगूड व मुरगूड परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली.
Advertisements

गेले आठ दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. पण या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकानां दिलासा मिळाला. मुरगूड येथिल बहीर्जी पेट्रोल पंपाजवळून गावभागाकडे जाणाऱ्या रोडशेजारी असणारे झाड विद्युत खांब व विद्युत तारेवर उन्मळून पडल्यामुळे व हे झाड शेतात कोसळल्याने विजपुरवठा काही काळ खंडीत झाला होता.
Advertisements


पण विज मंडळाच्या कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेत काही तासातच विजपुरवठा सुरळीत केला. गुरुवारीही पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. या झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला.