मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने  शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील शहर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने संघाच्या विरंगुळा केंद्रामध्ये सुमारे ४०  शिक्षकांचा यथोचित सत्कार शिक्षक दिनानिमित्त  करण्यात आला.    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य पी डी मगदूम  होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, सचिव सखाराम सावर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न … Read more

निधन वार्ता – अनुबाई सोनुले

मुरगूड ता . कागल येथिल श्रीमती अनुबाई ज्ञानदेव सोनुले (वय ९३ )यांचे निधन झाले. मुरगूड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा गौराबाई सोनुले यांची सासू  तर माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले, माजी नगरसेवक कै. आनंदा सोनुले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात ४ मुले १ मुलगी सुना ,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधवार दिनांक ९/९/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता … Read more

निधन वार्ता – प्रकाश भोसले

मुरगूड ता . कागल येथिल सेवानिवृत रा .प. मंडळ वाहक , व सरपिराजीराव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रकाश भोसले ( वय ७१ ) यांचे त्यांच्या रहात्या घरी दुःखद निधन झाले .      शहरातील नामांकित अभियंता सागर भोसले व गोकुळ दुधसंघ सेवक जीवन भोसले यांचे ते पिताश्री होत. त्यांच्या निधनाने मुरगूड व परिसरात हळहळ व्यक्त होत … Read more

श्री छ.शाहू कारखान्याचे १०० रु. ऊस बील शेतक-यांच्या खात्यावर जमा – अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कागल येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागलने गत हंगाम २०२५-२६ मधील गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रु.१००/- प्रमाणे बील ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत.अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली. यावेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, … Read more

निढोरीत मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजे बँक व राजे फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम मुरगुड ( शशी दरेकर ) : राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक व राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने भैरवनाथ मंदिर, निढोरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.          शिबिराचे उद्घाटन राजे बँकेचे अध्यक्ष नवोदिता घाटगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या शिबिरात १६० हून अधिक … Read more

पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

*कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): लोकांनी आपली घरे, जमीनी प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत. त्यांच्या जमीनींवर प्रकल्प उभारुन अनेकांचे जीवन सुखकर झाले आहे. त्यामुळे पुनर्वसितांना सर्व प्रकारच्या अद्यायावत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रस्ताव तयार करावेत व त्यांच्या मान्यतेसाठी सात्यताने पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पुनर्वसन प्रलंबित प्रश्नांबाबत … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात बोगस दस्तावेजांना कठोर दंड

*कोल्हापूर, दि.4 (जिमाका): भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात बोगस दस्त करण्याचे धाडस कोणीही करु नये, अशा पध्दतीने कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. यावेळी त्यांनी महसूल यंत्रणेने पारदर्शी, गतिमान, कार्यपध्दती अवलंबावी. नागरिकांना नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. लोकांमध्ये महसूल विभागाच्या कामाप्रती सकारात्मक भावना निर्माण होईल, अशा प्रकारे काम करावे, असे प्रतिपदान … Read more

कोल्हापुरी चप्पल युनिट उद्घाटन: महिला सक्षमीकरणाची दिशा

सांगरुळ मधील कोल्हापुरी चप्पल युनिटचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सुमारे सव्वा कोटींचा प्रकल्प सुरु जिओ टॅग मानांकन असलेल्या कारागिरांकडून होणार चप्पल निर्मिती   कोल्हापूर (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सांगरुळ येथे सुरु करण्यात आलेल्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले. महिला … Read more

निधन वार्ता – श्रीमती आनंदी राजाराम गोंधळी

मुरगूड ता . कागल येथील श्रीमती आनंदी राजाराम गोंधळी (वय ८७ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.         त्यांच्या मागे दोन मुले ,एक मुलगी ,सूना ,नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन रविवार दि ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आहे.

शंकर पाटील हे ग्रामीण कथेतील दीपस्तंभ : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) : शंकर पाटील हे मराठी ग्रामीण कथेतील दीपस्तंभ होते असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते ते मंडलिक महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त केलेल्या ‘ग्रामीण कथाकार शंकर पाटील’ या भित्तिपत्रकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आपल्या मनोगत ते पुढे म्हणाले की, शंकर पाटील … Read more

error: Content is protected !!