कागल : नामदार हसनसो मुश्रीफ फौंडेशन कागल यांच्यावतीने माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक १ चे आयोजन प्रसंगी माजी ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री मा.हसनसो मुश्रीफ, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.जी बी कमळकर साहेब, विस्तार अधिकारी मा. श्री.गावडे साहेब, केंद्रप्रमुख श्री.श.र.इनामदार तसेच पदवीधर शिक्षक संघटनेचे श्री.सुकुमार पाटील सर, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष विलास पोवार सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास मगदूम सर, केंद्र संचालक संदीप सणगर सर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक त्याच प्रमाणे BRC पं.स.कागलचा सर्व स्टाफ, सम्राट सणगर, विद्यार्थी व पालक पत्रकार उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सुकुमार पाटील म्हणाले, मुश्रीफसाहेबांची शिक्षण व विद्यार्थाच्याबद्दल असणारी धडपड प्रेरणा शहरापासून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यापर्यंत फौंडेशनच्या माध्यमातून शिष्यवृती सराव परीक्षा पोहचवले.
मा.कमळकर साहेब म्हणाले, शिष्यवृत्तीमध्ये तालुका जिल्ह्यात अव्वल करण्याची ही प्रेरणा मुश्रीफ साहेबांच्यामुळेच मिळाली. शाळा डिजिटल इत्यादीचा उल्लेख केला. मा. मुश्रीफ साहेब म्हणाले, शालेय शिक्षण राज्य मंत्री असल्यापासून आजपर्यत शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, ऑनलाईन शिक्षण, वित्त आयोगा कडून मिळणारा निधीचा वापर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करावा यासाठी आदेश काढल्याचे नमुद केले. ज्या राज्यात शिक्षण व आरोग्यासाठी निधी खर्च केला जातो ते राज्य व मुख्यमंत्री आदर्श असतात. असे त्यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारच उदाहरण घेवून सांगीतले.
तसेच नियमांचे वाचन करून परीक्षा पारदर्शी व तणाव मुक्त पार पडाव्यात इत्यादी गोष्टीचे मार्गदर्शन केले. यावेळी यशवंतराव घाटगे हायस्कूलचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन श्री. एकनाथ तोडकर सर यांनी केले तर आभार मुख्याध्याक श्री विलास मगदूम सर यांनी मानले.