मुरगूड (शशी दरेकर) : कागलहून मुरगूड -आदमापूर – मालवण ही बससेवा सोमवार दि .२२ जूनपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती एस् टीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यानीं दिली .
या नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेमुळे कागल – मुरगूड परिसरातील कोकणात जाण्यासाठी प्रवाशांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे.
ही बससेवा दररोज सकाळी कागलहून ६ वाजता सुटणार असून सावर्डे -मुरगूड -आदमापूर -मुदाळ तिट्टा -राधानगरी -फोंडा – कणकवली -कसाल- मालवण या मार्गावर ही बस धावणार आहे . मालवणहून पुन्हा ही बस १ वाजता पुन्हा याच मार्गाने परतीचा प्रवास करणार आहे.

कोकणातील प्रवाशांसाठी श्रीक्षेत्र आदमापूर येथिल सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी व कागल – मुरगूड परिसरातील प्रवाशानां थेट कोकणात जाण्यासाठी या बससेवेचा उपयोग होणार आहे . तसेच ही बस मुरगूडहून कागलकडे पाच वाजता जाणार असल्याने शालेय विद्यार्थ्यांची घरी जाण्याची सोय होणार आहे . या नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेमुळे प्रवाशामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे .