छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मंडळ, ता. कागल येथे शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते.

Advertisements

सदर कार्यक्रमास मुरगूड नगरपरिदेच्या नगराध्यक्षा सौ.सुहासिनीदेवी प्रवीणसिहं पाटील ,उपनगराध्यक्षा सौ रेखाताई  मांगले ,सौ रुपाली  अंगज व मुरगूड नगरपालिकेतील सर्व नगरसेवक तसेच श्री. अमरदीप वाकडे ,तहसिलदार कागल, श्री.अतिश वाळुंज मुख्याधिकारी मुरगूड नगरपालिका ,श्री. सौरभ तुपकर, उपअधीक्षक भूमिअभिलेख तसेच मंडळातील सर्व गावांचे सरपंच, सदस्य, शेतकरी लाभार्थी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात आली तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महसूल विभागाकडील ५०४,पुरवठा विभाग ९३०,महा इ सेवा २६४, महिला बचत गट १७, एकात्मिक बाल विकास प्रकल्प ६३,महावितरण विभाग ०३, , आरोग्य विभाग २६८९, एकूण एकंदर ४४६० इतक्या खातेदार यांना लाभ देणेत आला.

मा.तहसीलदार कागल यांनी शिबीराचे महत्व पटवून सांगितले व सर्व योजनांची माहिती दिली .नगरसेवक श्री शिवाजी चौगुले ,पंचायत समिती सदस्य सौ दीपाली अंगज यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

Leave a Comment

error: Content is protected !!