‘शाहू’ च्या ‘व्हॅनिला’ आणि ‘मँगो’ लस्सीचे नवोदितादेवी घाटगे यांच्या शुभहस्ते दमदार लाँचिंग

उपउत्पादनांच्या साखळीत आणखी दोन उत्पादनांची भर

कागल (प्रतिनिधी) : शाहू दूध संघाच्या नव्या ‘शाहू व्हॅनिला लस्सी’ आणि ‘शाहू मँगो लस्सी’ या आकर्षक उपउत्पादनांचे लाँचिंग उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राजे बँकेच्या अध्यक्षा व शाहू दूध संघाच्या मार्गदर्शिका सौ. नवोदितादेवी घाटगे यांच्या हस्ते या नवीन उत्पादनांचे अनावरण करण्यात आले.

Advertisements

यावेळी बोलताना सौ. घाटगे म्हणाल्या, “सहकारमहर्षी स्व. राजेसाहेब यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या शाहू दूध संघाने गुणवत्तेच्या बळावर ग्राहकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू दूध संघ सातत्याने प्रगती करत आहे. दूध, दही, ताक, पनीर, बासुंदी, बर्फी, प्रसाद पेढा, तूप आणि लस्सी अशा विविध उत्पादनांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Advertisements

त्याच विश्वासातून आता व्हॅनिला आणि मँगो या दोन नव्या स्वादातील लस्सी बाजारात आणण्यात आली असून, या उत्पादनांनाही ग्राहकांची पसंती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात उदय मांगोरे, पंढरी पाटील आणि उत्तम कागले यांचा ‘आदर्श कर्मचारी’ म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संग्राम पाटील,असिस्टंट जनरल मॅनेजर दिपक पाटील, पुणे येथील वितरक संग्राम गाडे, मार्केटिंग मॅनेजर बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!