मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज ज्युनिअर कॉलेजमधील सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. रवींद्र बाबुराव शिंदे यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूरवरुन शुक्रवार दि. ८ मे पासून मंगळवार दि. १२ मे पर्यंत दररोज सकाळी ७ वा. प्रसारित होणार आहेत.
सलग पाच दिवसाच्या कालावधीत कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून ‘ऐसी अक्षरे रसिके’ या सदरामध्ये दररोज आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विविध विषयांवर वैचारिक बंध प्रसारित होणार आहेत.

समाजातील विविध नामवंत लेखकांचे वैचारिक लेख या सदरामध्ये प्रसारित होत असतात. प्रा. शिंदे हे दै . तरुण भारतचे बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे विविध विषयांवर लेखही प्रसिद्ध झाले आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सूत्रसंचालनही केले आहे. त्यांचा विविध कार्यक्रमात सहभाग असतो.
या अगोदर ११ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान त्यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे प्रविण चिपळूणकर यांच्या आवाजात प्रसारीत झाले होते. यावेळचे प्रसारण स्वतः प्रा. शिंदे यांच्या आवाजामध्ये होणार आहेत.