सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील श्री. विकास विलास सूर्यवंशी (वय ३४) हे दिनांक २४/११/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले आहेत. ते अद्याप परत आलेले नाहीत. घरातील सर्वांनी तसेच नातेवाईकांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाहीत.
त्यांच्या घरातील लोकांनी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी कागल पोलीस ठाण्यात सदरची व्यक्ती मिसिंग झाल्याची वर्दी दिली आहे. सदरची व्यक्ती रंगाने सावळी, उंची ५ फूट ६ इंच, नाक सरळ, केस काळे कुरळे, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, डाव्या हातावर ‘शिवम’ असे गोंदलेले आहे, माथ्यावर जुन्या जखमेचा व्रण, मराठी भाषा बोलतात. अशा स्वरुपाची व्यक्ती आढळल्यास खालील नंबरवर 9766381445/7020701717/9881903350
त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.