गर्भवती महिलांनी आहारात या भाज्यांचा समावेश करावा
- गरोदरपणात महिलांनी आहारात डाळींचा समावेश करावा. यामध्ये लोह, फायबर, फोलेट इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात. हे आवश्यक पोषक घटक महिलांसाठी फायदेशीर आहेत.
- गर्भवती महिलांनी दररोज सकाळी एक कप दुध प्यावे. दुधात प्रथिने, कॅल्शियम कार्ब्स, हेल्दी फॅट्स आणि फायबर आढळतात.
- शरीरात प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करा. अंड्यामध्ये प्रथिने तसेच व्हिटॅमिन-ए, बी12, बी2, बी5, फॉस्फरस, लोह, सेलेनियम देखील आढळतात.
- गर्भवती महिलांनी ब्रोकोलीची भाजी खावी. ब्रोकोलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, के, लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. हे पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
- अनेक वेळी गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये लोहाची कमतरता दिसून येते. यासाठी आहारात पालेभाज्या तसेच डाळी यांचा समावेश करावा.
- गर्भवती महिलांनी आहारात बीन्सचा समावेश करणं आवश्यक आहे. बीन्समध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन-बी आणि कॅल्शियम हे आवश्यक पोषक घटक आढळतात.
- गर्भाधारणेदरम्यान बाळाच्या शारीरिक विकासासाठी साल्मन माशाचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही आहारात सीफूडचाही समावेश करु शकता. यामुळे शरीराला आवश्यक ओमेगा फॅटी-3 अॅसिड आढळते. हे आवश्यक पोषक मेंदू आणि डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.