वाघापूरात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मडीगले (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी प्रभात फेरी झाल्यानंतर तलाठी कार्यालयाच्या आवारातील ध्वजारोहण तलाठी रणजीत पाटील यांच्या हस्ते पार पडले.

Advertisements

यानंतर ग्रामपंचायत कार्यालया समोरील ध्वजारोहण सरपंच वापूसो आरडे यांच्या हस्ते झाले विद्या मंदिर वाघापूर शाळेतील ध्वजारोहण अमृत पाटील यांच्या हस्ते तर वाघापूर हायस्कूल वाघापूर येथील ध्वजारोहण प्रयोगशाळा परिचर भिकाजी कांबळे यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी आजी,माजी सैनिकासह ग्रामस्थ तरुण मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!