बातमी

करनूर- वंदूर येथील विद्यार्थ्यांना जादा बस मिळावी आंदोलनाद्वारे केली मागणी

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील विद्यार्थ्यांचे एसटी बस थांबत नसल्यामुळे होत आहे शैक्षणिक नुकसान. ग्रामपंचायत ने वारंवार एसटी आगर प्रमुखांकडे निवेदनाद्वारे जादा बसची मागणी करून सुद्धा याची दखल घेतली जात नाही. यामुळे करनूर येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी, पालक वर्ग, ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी एसटी बसेस अडवून आंदोलन केले.

यावेळी करनूर मध्ये कागल- बाचणी व कागल – शेंडूर या मार्गावरील दोन एसटी बसेस अडवून ठेवल्या व या मार्गावरून येणाऱ्या गाड्या पूर्ण क्षमतेने भरून येत असल्यामुळे करनूर हा बस स्टॉप शेवटचा असल्याने येथे गाडी थांबवली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा त्रास करनूरकराना होत आहे.

प्रत्येक वेळी जादा एसटी साठी आंदोलने करावे लागते. मग एसटी आगार प्रमुख याची दखल घेतात. हा प्रवास कधी थांबणार असा सवाल ही यावेळी पालक वर्गातून उमटत होता. त्यामुळे वंदूर मुक्काम बस मिळावी अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत होती. कागल आगार च्या स्थानक प्रमुख रूपाली ढेरे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी त्वरित जादा एसटी बस सोडून हा प्रश्न सोडवतो असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलन दरम्यान उपसरपंच प्रवीण कांबळे, समीर शेख, तंटामुक्त अध्यक्ष वैभव आडके, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा शेख, अभय चौगुले, विजय चव्हाण, राजमहंमद शेख, अस्लम शेख, शिवाजी घोरपडे, पोपटराव जगदाळे आदींसह विद्यार्थी- विद्यार्थिनी व पालक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण….
करनूर- वंदूर येथील विद्यार्थ्यांची एसटी बस न थांबल्यामुळे आम्हा विद्यार्थी, विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल व्यक्त करत, बस सेवा लवकरात- लवकर सुरू झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू.

आमच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण….
करनूर- वंदूर येथील विद्यार्थ्यांची एसटी बस न थांबल्यामुळे आम्हा विद्यार्थी, विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल व्यक्त करत, बस सेवा लवकरात- लवकर सुरू झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू.

विद्यार्थिनी- कुमारी सानिया शेख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *