
मुरगूड ( शशी दरेकर) : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या उजव्या कालव्यावरील सोनाळी तालुका कागल येथील गेट जवळील दोन्ही बाजूंची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे कॅनॉलला भगदाड पडून कॅनॉल फुटुन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे . अशी वेळ येऊ नये म्हणून दोन्ही बाजूंच्या कोसळलेल्या संरक्षण भिंतीची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निढोरी उजव्या कालव्यावरील सोनाळी गेट जवळ असणाऱ्या कॅनॉलच्या संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. गेल्या वर्षी एक संरक्षक भिंत कोसळली होती याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते. तर यावर्षी त्याच्या शेजारील दुसरी भिंत कोसळली आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे.

जर या दोन्ही संरक्षण भिंतीची दुरुस्ती लवकरात लवकर झाली नाही तर कॅनॉलला भगदाड पडून तो फुटू शकतो. त्यामुळे याची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सोनाळी गेट जवळील दोन्ही बाजूंच्या संरक्षक भिंती कोसळल्या आहेत.

यामुळे कॅनॉलला मोठ्ठे भगदाड पडून परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस पिक शेतीचे नुकसान होऊ शकते. पाटबंधारे विभागाचेही लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संरक्षण भिंतीची दुरुस्ती लवकरात लवकर करावी व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी पाटबंधारे विभागाकडे मागणी आहे.’