घोडा गाडी पलटी होवुन गाडी मालक मयत

कसबा सांगाव येथील घटना

कागल / प्रतिनिधी :  अचानक घोडा उधळला आणि गाडी पलटी झाली. डोक्याला गंभीर मार लागल्याने घोडा गाडी मालकाचा मृत्यू झाला. ही घटना तारीख 18 रोजी रात्री 8.30 वाजणेच्या सुमारास कसबा सांगाव तालुका कागल येथे घडली. वासिम आब्बास कलावंत वय वर्षे -36,राहणार- कलावंत मळा – कसबा सांगाव असे मयत घोडागाडी मालकाचे नाव आहे.अपघाताची नोद रात्री उशीरा कागल पोलीस ठाण्यात करणेत आली.

Advertisements

           कागल पोलीसानी दिलेल्या माहिती वरुन, मयत वासिम कलावंत हा आपली घोडा गाडी घेऊन हुपरी रस्त्यावरून शेताकडे वैरण आणणेसाठी गेला होता. विशाल इंजीनियरिंग वर्क्स च्या वळणावर आला असता घोडा अचानक उधळला.

Advertisements

यावेळी घोडा गाडी पलटी झाली. घोडा गाडीतून रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्यास कागलच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मयत वासिम हा प्लंबर व वेल्डरचे काम करीत असे.

       त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कागल पोलीस ठाण्याचे हावलदार श्री भाट हे पुढील तपास करीत आहेत.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!