कागल /प्रतिनिधी : कन्नड सक्तीच्या विरोधात 22 जून रोजी बेळगाव येथील जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार आहे सदरचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने करण्यात येईल या दोन्ही आंदोलनामध्ये उबाठा शिवसेना सर्व शक्तीनिशी सहभागी असेल, अशी माहिती उबाठाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिली.
गेल्या काही महिन्यापासून कर्नाटक राज्यामध्ये कन्नड भाषा फलक सक्ती वाढत आहे.यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने मुंबई येथे वर्षा बंगल्यावर बोलवावी,तसेच कन्नड भाषा संवर्धन योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करणेत आले आहे. हा निर्णय महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगडे यांनी घेतला आहे

मराठी भाषिकांच्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच ठामपणे उभा राहिला आहे. तारीख 22 व 29 जून 2026 रोजी होणाऱ्या दोन्हीही आंदोलनामध्ये उबाठा पक्ष असेल अशी माहिती सहसपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिली आहे.