कोल्हापूर भोई समाजाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ

कोल्हापूर जिल्हा भोई समाजाचा स्तुत्य उपक्रम; महापौर रूपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि समाजातील युवा पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची नवी शिखरे गाठावीत, या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा भोई समाजाच्या वतीने शनिवार, २६ सप्टेंबर रोजी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Advertisements

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याकडून दरवर्षी समाजासाठी प्राप्त होणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा तसेच समाजातील दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या सहकार्याचा विनियोग करून हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Advertisements

या कार्यक्रमाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. राजेंद्र रामचंद्र भोई व डॉ. हर्षल भोई यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष सुनील काटकर होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. जयसिंगराव झिटे, सेक्रेटरी सुभाष अहिरे यांच्यासह संचालक मंडळातील गणपतराव नलवडे, सोपान कनोजे, राजेंद्र ठोंबरे, सुनील घाग, नामदेवराव तिकोणे, सचिन नलवडे, धोंडीराम कांबळे, सौ. वर्षा मुळे, सौ. जयश्री वस्ताद, दिलीप भोई आणि रवींद्र नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

या प्रसंगी दहावी आणि बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे समाजोपयोगी कार्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भवितव्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला कोल्हापूर जिल्ह्यातील भोई समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

“गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान!”

— कोल्हापूर जिल्हा भोई समाज, कोल्हापूर

Leave a Comment

error: Content is protected !!