खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या

मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल

मुरगूड  (शशी दरेकर) : सोनगे ता. कागल येथे खाजगी सावकाराकडून घेतलेल्या पैशांच्या परतफेडीच्या जादा व्याजाच्या मागणीसह धमकी व मानसिक त्रासाला कंटाळून श्रीधर दत्तात्रय डावरे ( रा.सोनगे वय ४८ )याने  आत्महत्या केली आहे. याबाबत या प्रकरणी मृताची पत्नी सविता श्रीधर डावरे (वय ४३, रा. सोनगे, ता.कागल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निवास अण्णासो पाटील (रा.बाणगे, ता. कागल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

      पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपी खासगी सावकारी करत असून फिर्यादीच्या मृत पतीने आरोपी निवास पाटील याच्याकडून व्याजाने ९ लाख रुपये घेतले होते.

Advertisements

त्यापैकी व्याजासह २६ लाख रुपये श्रीधरने परत केले होते. तरीही आरोपी हा मयत श्रीधर डावरेकडे २५ लाख रुपये जादा व्याजदराने देण्याविषयी मागणी करीत होता यासंदर्भात त्यास धमकी व मारहाण केली जात असल्याने या मानसिक तणावातून श्रीधर डावरेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच मयत श्रीधर ने बायको सविताला पाठवलेल्या मोबाईल मेसेज मध्ये  “सविता तू माझ्या साठी भरपुर केलस पण मी काही करु शकलो नाही मला माफ कर मी माझ्या समू जवळ जातो तु शभोला फुलासारख सांभळ” “माझ्या खिशात चीठी ठेवली आहे” “मला आता सहन  होइना झाल” असे तीन मेसेज टाकुन त्याखाली कागदावर लिहीलेल्या चि‌ट्ठीचे दोन फोटो पाठविले व त्यानंतर विषारी तननाशक सेवन केले असे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisements

      या प्रकरणाची मुरगूड पोलीसात रविवारी मध्यरात्री नोंद झाली असून महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ .४५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे  .या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!