कसबा सांगाव (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका अल्पवयीन कॉलेज तरुणने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Advertisements
घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. तरुणीचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
Advertisements

या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.