बातमी

शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर, दि.19 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शासकीय ग्रंथागार कोल्हापूर शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, ताराबाई पार्क, पितळी गणपती समोर, कोल्हापूर येथे दि. 21 जानेवारी 2023 पर्यंत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत शासकीय प्रकाशनांच्या खरेदीवर 10 टक्के सुट देण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारच्या प्रभारी व्यवस्थापकांनी दिली आहे.