सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक

कोल्हापूर दि. 28 (जिमाका) : इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 1 मार्च, 2024 रोजी मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, विधान भवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अवर सचिव निलेश पोतदार यांनी कळविले आहे. Western Digital WD Green SATA 240GB, Up to 545MB/s, 2.5 Inch/7 mm, … Read more

Advertisements

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ –  कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.             ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत … Read more

कृषी विभागाच्या गट – क संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 11 : कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी ३ एप्रिल २०२३ ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीस अनुसरुन … Read more

राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी (june 2023)

कोल्हापूर : भारतीय हवामान हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होणे अपेक्षित होते. यापूर्वी ११ जून २०२३ रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. दि. २४ जून २०२३ रोजी राज्यात बहुतांश भागात पावसास सुरुवात झाली आहे. सध्यस्थितीत दि.२५ जून, २०२३ अखेर सरासरी पर्जन्यमान १७३ मिमी असून प्रत्यक्षात मात्र ४१.९ … Read more

उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादन : राज्यातला पहिलाच प्रयोग कोल्हापूरात यशस्वी

जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा प्रयोग कशा पध्दतीने राज्य स्तरावरील पहिलाच प्रयोग ठरला याची ही यशोगाथा..  कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग अर्थात शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यामधे पूर्वापार खरीप हंगामात नाचणीचे पीक घेतले जाते. पुर्वीच्या काळी नाचणी पिकवणा-या प्रत्येकाच्या … Read more

कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प

महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला. राज्याच्या या अर्थसंकल्पात ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतूद करण्यात आली असून हा अर्थसंकल्प ‍कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा आहे. काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र- काजू … Read more

शेतकऱ्यांसाठी अपघात विमा बाबत मोठी बातमी

मुंबई : शेती करताना नैसर्गिक अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो. विमा कंपनीमार्फत प्रस्ताव मंजुरीला दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. आता ही योजना शासनामार्फत राबविण्याचा विचार आहे, अशी माहीती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

खरेदी योजना हंगाम २०२२-२३ अंतर्गत धान खरेदी २८ फेब्रुवारीपर्यंत व नाचणी खरेदी ७ मार्च पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर,दि. 23 : धान व नाचणी विक्रीकरीता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विक्री करीता २८ फेब्रुवारी व नाचणी विक्री करीता ७ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा sms आला आहे. त्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर धान व नाचणी विक्री करावी. असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत दादासाहेब खाडे यांनी केले आहे. जिल्हयामध्ये शासकीय … Read more

भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या – हेमंत पाटील

आधारभूत किंमत निश्चित करुन देण्याची मागणी मुंबई, २१ फेब्रुवारी २०२३ : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बळीराजाला सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधानांचे नेतृत्व देशासह जगाला नवीन दिशा देणारे आहे, हे विशेष. यंदा भारताच्या आग्रहाखातर संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरा करीत आहे. अशात देशातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी … Read more

कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती

कोल्हापूर : पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहानी या लोकोत्सवात उलघडणार आहे. यामुळे नव्या वाटचालीसाठी आशेची नवी किरणे यातून मिळणार आहेत. लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा … Read more

error: Content is protected !!