कोल्हापूर : कागल नगरीचे लाडके व्यक्तिमत्व व देशातील पहिले अपक्ष खासदार आणि जेष्ठ विचारवंत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुस्तकांवर परिसंवादा’ चे आयोजन करण्यात येणार आहे.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर निंबाळकर ट्रस्ट व जागर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी १०.३० वा. शाहू सभागृह, मुख्याध्यापक संघ, विद्याभवन, शिवाजी पार्क, कोल्हापूर येथे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून लेखक व शिक्षणतज्ञ प्रा. श्रीकांत पाटील, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत लेखक, लेखक प्रा. बी. जी. मांगले व प्रा. जे. बी. बारदेस्कर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, कोल्हापूर मंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ. मीना शेंडेकर, व सारथी संचालक विलास पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.