कोल्हापूर(प्रा.सुरेश डोणे) : श्रीलंका येथे झालेल्या इंडिया -श्रीलंका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कोल्हापूर येथील विमल इंग्लिश स्कूल चा विध्यार्थी नेहाल प्रशांत पटवणे याने दोन सिल्वर मेडल मिळवले आहेत.
त्याला कराटे प्रशिक्षक रमेश पिसाळ व सुषमा पिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच स्कूलच्या सचिव मा.लीना कर्तस्कर, प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.या यशाबद्दल नेहालवरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.