लेफ्टनंट असोसिएट एनसीसी अधिकारी म्हणून समीर घोडके महाविद्यालयात रूजू

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल व्यापारी महादेव घोडके यांचे सुपुत्र व दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथे सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत असणारे प्रा. समीर महादेव घोडके हे कामठी, नागपूर या ठिकाणी झालेल्या ७५ दिवसांचे एनसीसी ऑफिसरचे भारतीय सैन्याद्वारा देण्यात येणारे अतिशय खडतर असे सैनिकी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडून नुकतेच महाविद्यालयात लेफ्टनंट असोसिएट एनसीसी अधिकारी म्हणून रुजू झाले.

Advertisements

त्यानी प्रशिक्षणामध्ये  सैन्यदल ड्रिल, फिजिकल ट्रेनिंग, वेपन ट्रेनिंग, फायरिंग,  फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, कॅम्प क्राफ्ट, आपत्ती व्यवस्थापन आदी विविध घटकांवरील प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणासाठी संपूर्ण देशातील विविध भागातील तब्बल ५०० हून अधिक प्राध्यापक उपस्थित होते. प्रा.घोडके यांना ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कोल्हापूर मार्फत एनसीसी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. या त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisements

1 thought on “लेफ्टनंट असोसिएट एनसीसी अधिकारी म्हणून समीर घोडके महाविद्यालयात रूजू”

Leave a Comment

error: Content is protected !!