सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांचा उपक्रम
मुरगूड (शशी दरेकर) : बस्तवडे, ता. कागल येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, महादेव पाणीपुरवठा संस्थेचे प्रमुख तसेच लोकनेते स्वर्गीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते स्मृतीशेष पुंडलिक श्रीपती कांबळे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन केवायसी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्मृतीशेष पुंडलिक कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन आयुष्यमती द्वारकाबाई पुंडलिक कांबळे व कांचन गौतम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक आयु. महेश धम्मरक्षित यांनी बुद्धवंदना व त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदुराव कांबळे सर होते, तर जय दुर्गामाता पतसंस्थेचे चेअरमन वाय. आर. जाधव सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शरद पुंडलिक कांबळे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. साताप्पा पुंडलिक कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण व वृक्षवाटप, आरोग्य शिबिरे तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्याचे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध शासकीय योजनांतील गरजू व गरीब लाभार्थ्यांची ऑनलाइन केवायसी करून आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. तसेच सर्व उपस्थितांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महेश धम्मरक्षित, हिंदुराव कांबळे, राहुल गौतम कांबळे, सौ. स्वप्नाली कांबळे, चंदाबाई कुरणे, शरद भोसले, एकनाथ चिखलकर, केशव वाळेकर, सखाराम पाटील, नामदेव कांबळे, म्हैपती कांबळे आदींनी स्मृतिदिनानिमित्त मनोगते व्यक्त करून स्मृतीशेष पुंडलिक कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमास जनार्दन पाटील, पांडुरंग वांगळे, आत्माराम जगदाळे, शरद नरके, अमृता पाटील, प्रवीण यादव, संतोष सुतार, प्रकाश ढेरे, संदीप कोरे, प्रमिला कांबळे, सचिव बाळासाहेब पाटील, सचिव अजित ढोले, संतोष पाटील , प्रकाश झानु पाटील, प्रमोद पाटील, हिरामणी कांबळे, अजय नंद्याळकर, एस. बी. कांबळे, एम. डी. कांबळे, दिलीप कापशीकर, संजय कांबळे, सरदार कांबळे, विशाल चिखलीकर, राजाराम कांबळे, निवास कांबळे, आर. आर. प्रधान, विनोद कांबळे, विलास कांबळे, अमर जिरगे, प्रा. अशोक कांबळे, मारुती कांबळे, एम. टी. शिंदे, तानाजी वायदंडे, जयसिंग कांबळे, धनाजी कांबळे, अमर माने, सूरज कांबळे, रवी कांबळे, नागेश कांबळे, अतुल कांबळे, सतीश वायदंडे, अर्जुन वायदंडे, शिवराज विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दयानंद सागर, प्रा. डी. एम. वनिक, आनंदा गोरबेंकर, अमोल पुष्पनगर , काका पाटील गुरुजी , डावरे गुरुजी , भाऊ कांबळे, पांडुरंग मोळके, राहुल कांबळे, शिवाजी कांबळे, ,दत्ता माळी, अभिजित कांबळे, गीता कांबळे, पंडित कांबळे, दिलीप कांबळे, योगेश कांबळे, आदित्य कांबळे, अनुराग कांबळे, प्रमिला माने, पूनम कांबळे, जयश्री कांबळे, शिवाली कांबळे , सविता पुणेकर , गामाजी खुपीरेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, बौद्ध समाजातील नागरिक, महिला व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार धर्मेंद्र कांबळे यांनी मानले.