शॉर्ट सर्किटमुळे आग लागून करंजीवणे येथे गवताच्या गंजीना आग शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुरगूड ( शशी दरेकर ) : करंजीवणे तालुका कागल येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून गवताच्या गंजी पेटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisements

      याबाबत समजलेली हकीकत अशी की करंजीवणे येथील ग्रामस्थ विद्यामंदिर शाळेच्या शेजारी असणाऱ्या गोठण या ठिकाणी जनावरांसाठी गवत आणि पिंजर अशा प्रकारचे जनावरांचे खादय जमा करून ठेवतात या ठिकाणी महावितरण कंपनीची ११००० व्होल्ट क्षमतेची विद्युत वाहिनी डी.पी. बसवली आहे या डी.पी मधून शॉर्टसर्किट होऊन  आग लागून गवताच्या गंजी पेटण्यास सुरुवात झाली.

Advertisements

यावेळी आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ग्रामस्थांनी पाणी मारून आग विझवण्याचा शर्तीचे प्रयत्न केले. पण आगीने रौद्ररूप धारण केलयाने संताजी घोरपड़े, बिद्री कारखाना, हमिदवाडा कारखाना, मुरगुड नगरपालिक अग्निशामक बंब आणि अनुश्री रोड कंपनी यांच्या टँकर ने आग आटोक्यात आणलयामुळे होणारे आणखी मोठे नुकसान टळले.

  या आगीमध्ये मधुकर गोजारे, पुंडलिक गोजारे, सदाशिव आग्रे, संभाजी बाबर, शालन सुतार, मधुकर गोजारे, प्रवीण पवार, सात्तापा आंग्रे यांची वैरण पेटून एक ते दीड लाख रुपये पर्यंतचे नुकसान झाले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!