मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथिल ” मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने ” जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्य संघाच्या ७५ वर्षीय जेष्ठ सदस्यांचा सत्कार , वाढदिवस शुभेच्छा , कॅरम सेट भेट वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या संयुक्त कार्यक्रमास मा . श्री . प्रविणसिंह पाटील ( चेअरमन विश्वनाथराव पाटील, दि मुरगूड सहकारी बँक ) प्रमुख पाहुणे व मा . श्री . नामदेवराव मेंडके ( माजी नगराध्यक्ष मुरगूड नगर परिषद ) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत .
मंगळवार दि .१ आक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० .३०वा . होणाऱ्या या संयुक्त कार्यक्रमास मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्र या ठिकाणी नागरीकानीं उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे , उपाध्यक्ष पी .डी. मगदूम व संचालक मंडळानीं केले आहे .