सहकारातून सहकार वाढला पाहिजे सहकारात कागल तालुका अग्रेसर – माजी खास संजय मंडलिक

राजर्षि शाहू पतसंस्थेची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

मुरगूड ( शशी दरेकर ) : जिल्हाभर सहकाराचे जाळे वाढत आहे . सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्थांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे सहकारातून सहकार वाढला पाहिजे सहकारात कागल तालुका अंग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले.

Advertisements

       येथील राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली . या सभेत माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रमुख मार्गदर्शन केले . सभाध्यक्षस्थानी सभापती दत्तात्रय सोनाळकर होते.

Advertisements

         राजर्षि शाहू पतसंस्थेची वार्षिक सभा येथील श्रीराम मंगल कार्यालयात नुकतीच पार पडली . प्रारंभी संस्थापक दिवंगत लोकनेते  सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन ॲड विरेंद्र मंडलिक यांच्याहस्ते करण्यात आले . उपसभापती रविंद्र ढेरे यांनी स्वागत केले तर तज्ञ संचालक एन वाय पाटील यांनी प्रास्ताविक केले.

          संस्थेचे जनरल मॅनेजर ज्ञानदेव पाटील यांनी अहवाल वाचन केले. अहवाल सालात संस्थेकडे १२३ कोटी ३२ लाखाच्या ठेवी जमा असून ७९ कोटी ८० लाखाचे कर्जवाटप केले आहे . २कोटी १५ लाख २४ हजार ८९८ इतका निव्वळ नफा झाल्याचे व एकूण ११७० कोटी १५ लाखाचा व्यवसाय केल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements

          यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून सन्मानीत करण्यात आले तर गडहिंग्लज बाजार समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल विलास कांबळे यांचा व मंडलिक साखर कारखान्याचे नूतन संचालक  प्रधान भोजे भगवान पाटील व अनिल सिध्देश्वर यांचा सत्कार करण्यात आला.

          सभेत विविध उपस्थित प्रश्नावर मारुती रावण, दिगंबर परीट, जयसिंग भोसले, राजेश गोधडे सखाराम सावर्डेकर आनंदा पाटील रमेश पाटील व पांडुरंग मेंडके यांनी चर्चेत सहभाग घेतला. संचालक नारायण मुसळे यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!