सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘भारतातील लोकसंख्या : वर्तमान स्थिती आणि भविष्य’ या विषयावर व्याख्यान संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : महाविद्यालयाच्या सॉक्रेटिस क्लबच्या वतीने प्राध्यापकांसाठी ‘भारतातील लोकसंख्या : वर्तमान स्थिती आणि भविष्य’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

Advertisements

कार्यक्रमाची सुरुवात सॉक्रेटिस क्लबच्या समन्वयक प्रा. मनिषा पाटील यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यांनी क्लबच्या उद्दिष्टांवर आणि व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रमुख वक्ते अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. गुरुनाथ सामंत यांनी आपल्या व्याख्यानात माल्थस यांचा लोकसंख्या सिद्धांत सविस्तरपणे स्पष्ट करत लोकसंख्या वाढीमागील विविध सामाजिक घटकांचा ऊहापोह केला.

Advertisements

साक्षरता, अंधश्रद्धा, विवाहाचे वय, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक जागरूकता यांचा लोकसंख्या वाढीशी असलेला परस्परसंबंध त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केला. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे देशासमोर निर्माण होणारी आव्हाने आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांचीही त्यांनी मांडणी केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. एस. एम. होडगे यांनी मार्गदर्शन करताना  वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती यामधील वाढती तफावत लक्षात घेता आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, निवारा आणि इतर मूलभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्यांवर प्रभावी नियोजन, जनजागृती आणि लोकसहभागाच्या माध्यमातून उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Advertisements
  • ENERGY-EFFICIENT BLDC TECHNOLOGY: Atomberg Renesa Pedestal fan comes with a 5-star rated energy-efficient BLDC motor. Th…
  • PRODUCT DETAILS: Atomberg Renesa Pedestal fan offers high air delivery of 76 CMM, and a speed of 1500 RPM ensuring optim…
  • REMOTE CONTROL CONVENIENCE: Atomberg Renesa Pedestal comes with an IR Remote for effortless control, allowing you to adj…
₹3,699

या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचा समारोप हिंदी विभागाचे प्रा. डॉ. अशोक पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!