मुरगूड शहर पत्रकार संघामध्ये दैनिक महासत्ता चे संस्थापक संपादक स्व.वसंतराव दत्तवाडे साहेब यांना  श्रद्धांजली

मुरगूड (शशी दरेकर) : दैनिक  महासता चे संस्थापक संपादक स्व. वसंतराव दत्तवाडे साहेब यांना मुरगूड शहर पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पत्रकार संघाच्या कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत सर्वांनी स्तब्धता पाळून त्यानां भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Advertisements

          यावेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी संपादक स्व.वसंतराव दत्तवाडे साहेब यांच्या निगर्वी आणि वृतपत्र क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव करून पत्रकार तयार करणाऱ्या महासत्ता विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक जन या क्षेत्रात नाव कमवत आहेत . अशा माणसातील देवाला आमची ‘भावपूर्ण श्रद्धांजली ‘अशा शब्दात सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Advertisements

     या श्रद्धांजली सभेस सुनिल डेळेकर , रविंद्र शिंदे,प्रकाश तिराळे ,जोतीराम कुंभार,राजू चव्हाण, दिलीप निकम , महादेव कानकेकर, अनिल पाटील , प्रविण सुर्यवंशी , श्याम पाटील , अविनाश चौगले , समीर कटके , संदिप सुर्यवंशी ,शशी दरेकर , भैरवनाथ डवरी ,ओंकार पोतदार ,सर्जेराव भाट, विजय मोरबाळे, अँथोनी उर्फ पपू बारदेस्कर, आदि पत्रकार उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!