कोल्हापूर वाहतूक बंद
व्हनाळी (सागर लोहार) : कागल तालुक्याच्या पश्चिम भागात साके,व्हनाळी बाचणी परिसरात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू होती मंगळवारी सकाळपासून पावसाने कांही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी दूधगंगा नदीची पाणी पातळी मात्र जैसे थे च आहे. दूधगंगा नदीवरील बाचणी ता. कागल पुल पाण्याखाली गेल्याने गारगोटी- कोल्हापूर बाचणी मार्गे कोल्हापूर वाहतूक बंद झाली आहे. पर्यायी खेबवडे-नांदगाव, नदीकिनारा – कागल या मार्गाने कोल्हापूर वाहतूक सुरू आहे.
गेले
चार दिवस धरण क्षेत्रातही मोठा पाऊस सुरू असल्याने दूधगंगा काळामवाडी धरणातून 1423 क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीपात्रात सुरू केला असुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दमदार पावसाने शेताशिवारात पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे डोंगर कपारीतून छोटे छोटे धबधबे कोसळत आहेत . या पावसाने माळराणातील पिकांना दिलासा मिळाला आहे. दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील ऊस व भात पिके पाण्याखाली गेली आहेत.