(Refurbished) Foxin Rock Wired Over-Ear Headphones with in-line Microphone, Lightweight, Adjustable & Portable Stereo Bass Headphones with 40mm Driver & 1.6 Meter Tangle-Free Cable
(as of 07/12/2023 20:11 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)(Refurbished) HP 245 G6 Notebook (AMD A9-9425/ 8GB Ram/ 256GB SSD/ Webcam/ 14"/ Win-10 Pro) 1 Year Warranty
₹15,699.00 (as of 07/12/2023 20:11 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)मंत्री मुश्रीफ यांच्या बदनामी बद्दल कागलमध्ये काढली अत्यंयात्रा
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या बदनामी बद्दल कोल्हापूर सह इचलकरंजी हातकणंगले कागल मुरगुड बिद्री खडकेवाडा येथे निषेध करण्यात आला. खालील कोल्हापुरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी श्री सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यामध्ये जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, सरचिटणीस राजेश लाटकर,आदिल फरास आदी प्रमुख उपस्थित होते. इचलकरंजीत अमित गाताडे,निहाल कलावंत,नितीन जांभळे,मदन कारंडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या पोस्टरला जोडा मारो आंदोलन केली. कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मंत्री मुश्रीफ यांच्या विजयाच्या तर सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक प्रवीण काळबर,नगरसेवक उपनगराध्यक्ष विवेक लोटे, पक्षप्रतोद नितीन दिंडे, पंकज खलिफ,आनंदा पसारे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. तसेच दावणे गल्ली परिसरात कार्यकर्त्यांनी सोमय्या यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. खडकेवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील, यांच्या नेतृत्वाखाली मयुर आवळेकर,संदीप खोत,रघुनाथ अस्वले,अमोल मंडलिक आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली. व कागल,मुरगुड,निपाणी मार्गावर रास्ता रोको केले. गडहिंग्लज मध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर,माजी नगराध्यक्ष किरण आण्णा कदम,शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने,महेश चलवादे गुंडेराव पाटील आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. व पुतळ्याचे दहन व निषेधाच्या घोषणा दिल्या. मुरगूड चे शहराध्यक्ष रणजीत सुर्यवंशी,सत्यजित पाटील,सुधीर सावर्डेकर, राहुल वंडकर,रवी परीट,रणजित भारमल,निवृत्ती हासबे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा पुतळा दहन केला. बिद्री बोरवडे येथे बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे,जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे,सोनाळीचे डी एम चौगुले,प्रवीण पाटील आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोमय्या यांच्या पुतळ्याचे दहन केले. जयसिंगपूर येथेही राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडा मारो आंदोलन व पुतळ्याचे दहन केले. यावेळी अण्णासाहेब कावणे, संभाजी मोरे, मुनीर शेख, विनायक गायकवाड, अमोल शिंदे, विकी संकपाळ, सागर माने आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Now loading...