भारतीय बौध्द महासभा व लोककल्याणच्या समता प्रतिष्ठानच्या वतीने अनिता कांबळे यांचा सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : भारतीय बौद्ध महासभा व लोककल्याण समता प्रतिष्ठान, कागल यांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी अनिता हिरामणी कांबळे नंद्याळकर यांची कोल्हापूर जिल्हा कर्मचारी सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

Advertisements

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक, सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सत्कारमूर्ती अनिता कांबळे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisements

     यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन अनिता कांबळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. जिल्हा महासचिव प्रा. अशोक कांबळे मळगेकर व मुरगूडचे माजी नगरसेवक एम. डी. कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. सत्कारमूर्ती अनिता कांबळे यांनीही आपल्या निवडीबद्दल मनोगत व्यक्त केले व सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व एन. एम. कांबळे सर होते. यावेळी लोककल्याण समता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य दिलीप कांबळे सर, सामाजिक कार्यकर्ते शंकर कांबळे उंदरवाडी, तालुकाध्यक्ष हिरामणी कांबळे सर, महासचिव दिलीप कांबळे कापशीकर, संघटक संग्राम कांबळे बेळुंकी, विद्रोही कवी बापूसो कांबळे, युवा कार्यकर्ते किरण कांबळे मुगळी, छायाचित्रकार दयानंद कांबळे, चंद्रकांत कांबळे, शंकर कांबळे बेलेवाडी काळम्मा, विक्रम कांबळे, रोहित सुतार अर्जुनवाडा, संतोष कांबळे हळदीकर, बाळकृष्ण कांबळे, मीनाताई बाळकृष्ण कांबळे, सरिता बाळासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कांबळे, विठ्ठल कांबळे, शशिकांत कांबळे, हर्षवर्धन कांबळे व युवा कार्यकर्ते अजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय संघटक महेश धम्मरक्षित सर यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!