कागल शहराचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूसानिमित्त ‘दिपावलीची पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन

कागल (प्रतिनिधी) : कागल शहराचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर यांच्या उरुसानिमित्त आणि प्रथमच कागल शहरामध्ये ‘स्वरताल’ व ‘स्वरतरंग’ यांच्या विद्यमाने ‘दिपावलीची पहाट’ या सुरेल सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Advertisements

हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ९/११/२०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता श्री राम मंदिर हॉल, खर्डेकिकर चौक, कागल येथे होणार आहे.

Advertisements

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
या कार्यक्रमामध्ये रसिकांना शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, नाट्यगीत, अभंग, भावगीत, भक्तीगीत यांसारख्या विविध कलागुणांचा आस्वाद घेता येणार आहे.

मान्यवर उपस्थिती व सौजन्य:
या कार्यक्रमाचे आयोजन श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस समिती, कागल; श्री. प्रताप (भैय्या) य. माने (संचालक, के.डी.सी.सी. बँक, कोल्हापूर) आणि सौ. सविता प्रताप माने (नगराध्यक्षा, कागल नगरपरिषद, कागल) यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.

प्रमुख कलाकार:
गायक: श्री. निलेश लिंबाळकर, कु. स्वरांशी वाघुर्डेकर, कु. मयुरी जोशी
हार्मोनियम व गायन: श्री. सतीश वाघुर्डेकर (संगीत विशारद)
तब्बल: श्री. अभिजित पाटील
बासरी: श्री. अमोल कांबळे
निवेदक: सौ. भाग्यश्री चरणकर
सिंथेसायझर: श्री. सुनिल गुरव
साऊंड: स्वर संध्या तेली बंधु, रेंदाळ

कागलमधील सर्व रसिक श्रोत्यांनी या सुरेल कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन उरूस समिती व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!