![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220730_173349.jpg)
मडिलगे(जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक मधील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री. ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर भरत असल्यामुळे येथील स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने यात्रेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती अध्यक्ष अरविंद जठार यांनी साप्ताहिक गहिनीनाथ समाचारशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले मंदिर परिसर व परिसरातील गेली आठ दिवस स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे .
गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही यात्रा रद्द करण्यात आली होती . मात्र यावेळी तब्बल दोन वर्षानंतर भरणाऱ्या या यात्रेसाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकासाठी वाहनतळ, एकेरी व दुहेरी मार्गाचा अवलंब, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची मुबलक सुविधा तसेच दर्शन मंडपात रांगेची सुविधा असणार आहे या दिवशी पहाटे चार वाजता विद्यमान आमदार प्रकाश आंबिटकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकासाठी खुले करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी या महाआरती दरम्यान प्रथम येणाऱ्या भाविकाचा देवस्थान समिती व आमदार आबिटकर यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
यात्रा सुरळीत पार पडण्याकरता गारगोटी पोलीस स्टेशन यांच्यावतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गारगोटी आगारातून ज्यादा एसटी बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .या कामी प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी वरूटे.. अडसूळ, व पोलीस निरीक्षक यांनी प्रशासकीय स्तरातून सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे, सचिव रावसाहेब बरकाळे, सदस्य जोतीराम आरडे, यशवंत उर्फ पप्पू जठार, रंगराव जठार, आनंदा जठार, दिगंबर कुरडे, सरपंच दिलीप कुरडे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, प्रकाश जठार, पोलीस निरीक्षक संजय मोरे, भिकाजी देसाई, संतोष भांदिगरे, श्रीकांत चौगले, राहूल पाटील, तेजस्विनी चौगले
यांच्यासह देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .