वाचा गहिनीनाथ समाचार अंक १७ ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक १७ दिनांक ०८-०१-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे. समाजातील चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब वृतपत्रकातून समाजासमोर येते – सपोनि दिपक भांडवलकर

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वतः च्या वैयक्तिक जीवनातील सुख दु:ख बाजूला सारून पत्रकार मित्र सामाजिकतेच्या भावनेतून लोकांच्या भावना प्रशासना पर्यंत पोहचवतात . पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे . समाजातील चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब वृतपत्रकातून समाजासमोर येते. असे प्रतिपादन मुरगूडचे सपोनि दिपक भांडवलकर यांनी केले. ते मुरगूड शहर पत्रकार फाऊंडेशनच्या वतिने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री … Read more

सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी कागलमध्ये कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार उद्घाटन कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्यांचे … Read more

यमगे च्या सरपंचपदी मुश्रीफ गटाच्या प्रमिला पाटील बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) – यमगे ता.कागल येथील सरपंच पदी मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या प्रमिला मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रशांत गुरव होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या आणि हलगी, कैचाळ च्या ठेक्यावर नूतन सरपंचाची मिरवणूक काढली. यमगे ग्रामपंचायतीवर मुश्रीफ संजय घाटगे गटाची सत्ता आहे. यामध्ये या आघाडीकडे … Read more

श्री विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेचे नूतन संचालक सातापा पाटील व शिवाजीराव पाटील यांचा व्यापारी पतसंस्थेतर्फे सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री . विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या नुतन संचालकपदी निवड झालेबदल बॅंकेचे जेष्ठ संचालक श्री. सातापा पाटील व नुतन संचालक श्री . शिवाजीराव पाटील ( यमगेकर ) यांचा मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची असणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेचे विद्यमान सभापती श्री. … Read more

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या सदस्यपदी सुखदेव येरुडकर यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे ( साई आखाडा ) वस्ताद व माजी नगराध्यक्ष, राणाप्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुखदेव गणपती येरुडकर यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या कार्यकारिणीत सदस्यपदी निवड झाली आहे. ही निवड २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी आहे . या निवडीकामी खास. संजयदादा मंडलिक यांचे मोलाचे … Read more

प्राथमिक आरोग्य केंद्र इस्पुर्ली अंतर्गत परिते गावात हरिनाम सप्ताहामध्ये अन्नविषबाधा

जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : प्राथमिक आरोग्य केंद्र इस्फुर्ली, ता करवीर अंतर्गत परिते गावामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान हरिनाम सप्ताहामध्ये एकूण १५० लोक सहभागी झाले होते. सप्ताहानंतर लोकांना जेवण देण्यात आले होते. त्यामध्ये भात, आमटी, कुर्मा व गुलकंद खीर देण्यात आली होती. सदरचे जेवण स्थानिक आचाऱ्यांमार्फत … Read more

सावर्डे येथे साई भंडाऱ्या निमित्य साईभक्तानी घेतला कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ

विविध कार्यक्रम उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात पार मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे ( ता. कागल ) येथील श्री . साईबाबा मंदीराचा २१ वा वर्धापनदिनानिमित्त बुधवार दि .३ जानेवारी २०२४ रोजी साईभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. साई भंडाऱ्यानिमित्त बुधवार दि .३ जानेवारी रोजी सकाळी ५ .३० वाजता … Read more

कागलला १३ पासून राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कागल : कागल नगरपरिषदेच्यावतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन १३ ते १८ जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे २१ वे वर्ष आहे. रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत केले. शनिवारी (ता.१३) पहिले पुष्प रविकिरण पराडकर (निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई) यांचे ‘वर्दीतील विनोद आणि कविता’, रविवारी … Read more

महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे अशासकीय सफाई कामगार पद भरती

कोल्हापूर दि. 2 (जिमाका) :  महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय सफाई कामगार पदे भरण्यात येणार आहेत. सफाई कामगार पदे कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर असून या पदासाठी माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिनांक 6 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज सादर करावेत, असे … Read more

error: Content is protected !!