
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री . विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या नुतन संचालकपदी निवड झालेबदल बॅंकेचे जेष्ठ संचालक श्री. सातापा पाटील व नुतन संचालक श्री . शिवाजीराव पाटील ( यमगेकर ) यांचा मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची असणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेचे विद्यमान सभापती श्री. किरण गवाणकर, उपसभापती श्री. प्रकाश सणगर यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी बोलतानां नुतन संचालक शिवाजीराव पाटील म्हणाले बॅंकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगितले.
यावेळी श्री . व्यापारी नागरी सह .पतस्थेचे संचालक श्री . प्रशांत शहा यानी विश्वनाथराव पाटील सहकारी बँकेच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीची प्रशंषा केली.
या सत्कार प्रसंगी व्यापारी पतसंस्थेचे संचालक सर्वश्री किशोर पोतदार, प्रशांत शहा, हाजी-धोंडिराम मकानदार, शशिकांत दरेकर, प्रदिप वेसणेकर, निवासराव कदम संदिप कांबळे, कार्य लक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर ,यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.