मुरगूड ग्रामीण रुग्णालयास  सुविधा, तज्ञ डॉक्टर्सची तातडीने नियुक्ती करा मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ग्रामीण रुग्णालयात परिसरातील ३० ते ४० गावचे रुग्ण येतात पण या रुग्णालयात सुविधांची वाणवा आहे . त्या सुविधा उपलब्ध  करून देण्यासाठी व तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी मुरगूडमधील माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.           सदर निवेदनात म्हटले आहे कि … Read more

देशातील लैंगिक अत्याचारांचा व हिंदुत्वावरील टीकेचा मुरगूड मध्ये जाहीर निषेध

मुरगूड ( शशी दरेकर) : देशातील लैंगिक अत्याचार व कोल्हापूरात हिंदुत्वा वर  काढलेल्या अपशब्दांचा मुरगूड येथे युवा संघटनांनी जाहीर निषेध केला. कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. बदलापूर येथील शाळेत लहान बलिकांवरील लैंगिक अत्याचार तसेच शिये येथे नराधमाने दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या गंभीर निर्दयी … Read more

मुरगूडमध्ये आरटीओ ऑफिसने कोटा वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावण्याची मागणी

मुरगूडमध्ये आरटीओ ऑफिसने कोटा वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावण्याची मागणी वाहनधारकांकडून आंदोलनाचा इशारा मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूडमध्ये आरटीओ ऑफिसने कोटा वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावावा अशी मागणी करीत या प्रश्नी वाहनधारकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.        मुरगुड मध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी दुचाकी आणि चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना … Read more

राजीव गांधी यांच्या कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा- प्रा. सतीश देसाई

मुरगूड (शशी दरेकर) : “राजीव गांधी यांच्या विचार आणि कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा तसेच देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवून राष्ट्र उभारणीच्या कामात झोकून घ्यावे” असे मत आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई यांनी अध्यक्षस्थानावर बोलताना व्यक्त केले. ते गगनबावडा येथील आनंदी महाविद्यालयात आयोजित स्व. राजीव गांधी यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त बोलत होते. … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील हेळसांडपणा

नागरिकांनी अधीक्षकाना धरले धारेवर मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मध्ये ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या बाबतीत अक्ष्यम्य हेळसांड पणा होत असल्याच्या तक्रारी वारंवार येऊ लागल्याने नागरिकांच्या वतीने एक शिष्टमंडळ येथील वैद्यकीय अधिक्षक डवरी यांना भेटले.रुग्णालयात डॉक्टर हजर नसतात, आठवड्यातून फक्त दोन दिवसच येतात, वार्ड बॉय मार्फत रुग्णांना औषधे दिली जातात अशा तक्रारी नागरिकांनी सांगितल्या. या … Read more

बहिण भावाच्या अतूट नात्यातून विश्वशांतीची प्रेरणा मिळते – लता बहेनजी

मुरगूड ( शशी दरेकर ) – बहिण -भावाच्या अतूट नात्यातून विश्वशांतीची प्रेरणा मिळते, मनातील  वाईट विचार, विकार यानां तिलांजली देऊन शुध्द व चांगले विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यानी केले. मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात राखी पौर्णिमेनिमित्य रक्षाबंधनाच्या व भावबंधनाच्या कार्यक्रमात लता बहेनजी बोलत होत्या. प्रथम संघाचे संचालक महादेव वागवेकर यानीं … Read more

मुरगूडमधे महिलांचा साखर पेढे वाटून आनंदोत्सव

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याबद्दल मुरगूड शहरात महिलांनी साखरपेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला . तसेच महिलांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले .           यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कागल तालुका शासकीय सदस्यपदी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांचा सत्कार माजी नगरसेवक सुहास खराडे यांच्या … Read more

ग्रामीण रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराबद्दल रुग्णालय बंद करण्याचा नागरिकांचा इशारा

उद्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देऊन कार्यवाहीसाठी दोन दिवसाचा देणार अल्टीमेटम मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगुड येथे रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. डॉक्टराची ड्युटी असताना डॉक्टरांनीं वॉर्ड बॉय च्यामाध्यमातून उपचार केल्याची माहिती नागरिकांना मिळाली यामुळे संतप्त नागरिकांनी यांच्याकडून उपचार होत असतील तर दवाखाना बंद बरा असे सांगून … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय विभागाच्या मुलाखती पुढे ढकलल्या

मुंबई : महाराष्ट्र आयोगाच्या २३ ऑगस्ट, २०१४ रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती ३० ऑगस्ट, २०२४ रोजी होणार आहेत.             महाराष्ट्र आयोगातर्फे संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतींचे आयोजन आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर येथील कार्यालयात करण्यात आले होते.             महाराष्ट्र … Read more

निसर्गमित्र मंडळाच्या वतीने वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

सातत्यपूर्ण उपक्रमाचे २२ वे वर्ष मुरगूड ( शशी दरेकर ) : जगवतो वाढवतो पाट राखण करतो, वृक्ष माझा बंधू भाई सात जन्माची करतो. असा संदेश देत आपले संरक्षक बंधू वृक्ष त्यालाच राखी बांधून औक्षण करण्याचा उपक्रम येथील निसर्ग मित्र मंडळाने व महिला निसर्ग मंडळाने गेले बावीस वर्षे सुरू ठेवलाय. रक्षाबंधन निमित्त गेली २२ वर्ष सातत्यपूर्ण … Read more

error: Content is protected !!