कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत MAHATET दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 16 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि. 11 डिसेंबर 2024 रोजीच्या, प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत असून या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.

पेपर १ (१ ली ते ५ वी) मराठी माध्यम
पेपर २ (६ वी ते ८ वी) (गणित – विज्ञान) मराठी माध्यम
पेपर २ (६ वी ते ८ वी) (सामाजिक शास्त्र) मराठी माध्यम
या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असेही श्री. राठोड यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
A lot of of whatever you articulate is astonishingly appropriate and it makes me ponder why I hadn’t looked at this in this light previously. Your piece really did turn the light on for me personally as far as this particular topic goes. Nevertheless there is actually 1 point I am not really too comfy with and while I try to reconcile that with the actual central theme of your point, allow me observe exactly what all the rest of the readers have to point out.Well done.